घरताज्या घडामोडीCyclone Nisarga Live Update: मुंबईपासून चक्रीवादळ ३५० किलोमीटर अंतरावर!

Cyclone Nisarga Live Update: मुंबईपासून चक्रीवादळ ३५० किलोमीटर अंतरावर!

Subscribe

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उद्या फक्त १२ विमाने उड्डाणे करणार आहेत.

- Advertisement -

 


मुंबईपासून निसर्ग चक्रीवादळ फक्त ३५० किलोमीटर अंतरावर असल्याची माहिती आएमडीकडून देण्यात आली आहे. येत्या काही तासात चक्रीवादळाची तीव्रता वाढणार आहे.

- Advertisement -


हॉस्पिटल्सना जनरेटर बॅकअप ठेवण्याच्या सूचना

सविस्तर वाचा – 

Cyclone Nisarga: चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी ठाणे, केडीएमसीची आपत्कालीन यंत्रणा सज्ज


बुधवारी कोणीही समुद्र किनारी जाऊ नये

सविस्तर वाचा – 

Cyclone Nisarga: मुंबईच्या ६ समुद्र किनारपट्टयांवर जीवरक्षकांसह जवानही तैनात


उद्या पहाटेपासून सुरू होणाऱ्या वादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील वीजपुरवठा सुरक्षेच्या कारणावरून बंद करण्यात येणार आहे. वादळ पूर्णपणे निघून गेल्यावर सर्व लाईन तपासून पुन्हा वीजपुरवठा चालू केला जाणार आहे.


रत्नागिरी तालुक्याला त्यामानाने धोका कमी असला तरी मंडणगड, दापोलीला मोठा धोका असल्याने प्रशासनाने या किनारपट्टी भागातील सुमारे चार हजार लोकांचे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या पहाटे ५.३० वाजता वादळ घोंगावणार असून दुपारी १२ वाजता सुमारे १०० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे चिपळूण, खेड, राजापूर नगरपालिकांना अलर्ट करण्यात आले आहे अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली आहे.


निसर्ग चक्रीवादळाचा पार्श्वभूमीवर आज रात्री ८ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधणार आहेत. उद्यासाठी काय तयारी करण्यात आली आहे याबाबत फेसबुक लाईव्हमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलणार आहेत. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.


आज रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळ धडकणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले. त्याची चाहूल आज कोलाड (रायगड) येथे पाहायला मिळाली.


वसई पाचुबंदर येथे कोळी बांधवांनी निसर्ग वादळापुर्वी किनाऱ्यावर आपल्या कामांची आवरा आवर सुरू केली आहे.

Photo: वसईच्या बंदरावर वादळापुर्वीची धावपळ


महाराष्ट्रात कुठे, किती पाऊस होणार?

मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार येथे अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, अहमदनगर, पुणे आणि जळगाव येथे मुळधार ते अतिमुळधार पावसाची इशारा देण्यात आला आहे. तसंच कोल्हापूर आणि सातारामध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तर सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना आणि परभणीमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.


पुढचे दोन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, धुळे, नंदूरबार, नाशिक, पुणे घाट माथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. १२० किलोमीटर प्रति तास वेगाने हे वादळ धडकेल असा अंदाज पुणे वेधशाळेचा आहे.


निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पालघरमध्ये एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. एनडीआरएफच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, जवळपास किनापट्टीवरील १३ खेड्यांतील लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत हे ऑपरेशन सुरू आहे.


गोव्यापासून निसर्ग चक्रीवादळ २८० किलोमीटर दूर असून मुंबईपासून ४३० किलोमीटर लांब आहे. हे चक्रीवादळ उद्यापर्यंत पश्चिम किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. निसर्ग चक्रीवादळच्या पार्श्वभूमीवर पालघर, डहाणू, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या ठिकाणी एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.


कोरोना व्हायरसच्या संकटात महाराष्ट्रात आणखी एक संकट येऊन उभं ठाकलं आहे. पुढील १२ तास महाराष्ट्रासाठी अतीमहत्त्वाचे असल्याचे भारतील हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे चक्रीवादळात याचे रुपांतर झाले आहे. या चक्रीवादळाचे नाव निसर्ग असे आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होत असून त्याचे चक्रीवादळात रुपांतर झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -