घरताज्या घडामोडीCyclone Nisarga Live Update: महाराष्ट्राचे रक्षण करणाऱ्या सगळ्याचे मुख्यमंत्र्यांनी मानले आभार

Cyclone Nisarga Live Update: महाराष्ट्राचे रक्षण करणाऱ्या सगळ्याचे मुख्यमंत्र्यांनी मानले आभार

Subscribe

निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यातून मुंबईसह महाराष्ट्राचे रक्षण करणाऱ्या सगळ्यांचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आभार मानले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले? वाचा…

- Advertisement -


येत्या अडीच तासात रायगड, धुळे, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील भागांमध्ये आणि ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात अति-मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती आयएमडीने दिली आहे.

- Advertisement -


रत्नागिरी आणि श्रीवर्धनमध्ये वीजपुरवठा पूर्ववत सुरू झाला आहे. मुरुड, मांडगांव, गोरेगाव, अलिबाग, म्हसळा, गुहागर, दापोली तालुक्यातील वीज पुरवठा ईएचव्ही स्थानकांवरून वीजपुरवठा बंद केला होता


निसर्ग चक्रीवादळामुळे आज हवामानाच्या परिस्थितीमुळे पुणे विमानतळ येथे सहा विमाने वळविण्यात आली आणि एक रद्द केले.


रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये वीजेचा खांब पडल्याने ५८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे.


निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर अनेकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. या व्यक्तींना महापालिकेकडून अन्न आणि पाण्याचे वाटप केले आहे.


निसर्ग चक्रीवादळाने रायगड जिल्हा क्रोस केला आहे. मुंबई आणि ठाणे येथे ९० ते १०० किमी प्रतितास वाऱ्याचा वेग आणि मध्यम, जोरदार आणि मुळसधार पावसासह लँडफॉल नंतरचा अनुभव घेत आहोत, असे माहिती आयएमडी मुंबईच्या दक्षता अधिकारी शुभांगी भुते म्हणाल्या.


मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन संध्याकाळी ६ वाजल्यापासून पुन्हा उड्डाण सुरू होणार आहे, अशी माहिती विमानतळ जनसंपर्क अधिकाऱ्याने दिली आहे.

 


चक्रीवादळच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील दहा हजार नागरिकांना स्थलांतर करण्यात आले आहे. विविध तालुक्यातील या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.


रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ) ची टीमचे चक्रीवादळामुळे कोसळलेली झाडे हटवण्याच्या काम सुरू आहे.


रायगड जिल्ह्यातील काही भागात मोबाईल नेटवर्क सेवा विस्कळीत झाली आहेत, अशी माहिती जिल्हा दंडाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे. तसेच रायगड जिल्ह्यातील वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे.


निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईतील चौपट्यांना भेट देऊन तेथील सद्यस्थितीचा आढावा घेतला. मुंबईतील चौपाट्यांवर लाईफ गार्ड, जीवरक्षक बोटी, एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या असून संपूर्ण मुंबईकरांच्या सुरक्षिततेची पूर्ण खबरदारी घेण्यात आली आहे. मुंबईचे प्रथम नागरिक या नात्याने मी आपल्या सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी घेतली असून आपण आपली खबरदारी घेऊन नागरिकांनी घरीच राहण्याचे आवाहन महापौरांनी संपूर्ण मुंबईकरांना केले आहे. नागरिकांनी आज आणि उद्या घराबाहेर पडू नये, असे आवाहनही महापौरांनी यानिमित्ताने केले आहे.


भारतीय हवामान विभागाने पुढील २४ तासांसाठी मुसळधार पाऊस पडणार असल्याचे सांगितले आहे.


छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सायंकाळी ७ वाजेपर्यंत कोणत्याही विमानांचे उड्डाण किंवा लँडिंग होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.


निसर्ग चक्रीवादळाचा धोका पूर्णपणे निवळत नाही तोपर्यंत बृहन्मुंबई महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा या आपत्तीचा सामना करण्यासाठी अखंड कार्यरत आहे. गरज नसेल तर नागरिकांनी घराबाहेर पडू नये आणि प्रशासनाला पूर्णपणे सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी केले आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे निसर्ग चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत पश्चिम किनारपट्टीच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी सातत्याने बोलून माहिती घेत आहेत.


निसर्ग चक्रीवादळाचा प्रकोप सुरू झाला असून, अलिबाग शहरातील वीज, इंटरनेट, मोबाईल नेटवर्क विस्कळीत झाले आहे. चक्रीवादळामुळे नागरिकांमध्ये भीती वाढत आहे.


अरबी समुद्रात निर्माण झालेले ‘निसर्ग’ चक्रीवादळ राज्याच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यादृष्टीने बोरिवली पश्चिमेकडील गणपत पाटील नगरातील नाल्या लगत राहणाऱ्या नागरिकांना आज पालिकेच्या तरे शाळेत हलविण्यात आले. याठिकाणी मागील भागात मोठ्या प्रमाणात कांदळवन असून पुराची भीती वर्तवली जात आहे. माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर, एमएचबी पोलीस, अग्निशमन दल, पालीका कार्मचारी व स्थानिक कार्यकर्त्यांनी पेट्रोलिंग सुरू करत नागरिकांना सूचना केल्या. दरम्यान नागरिकांनी पालिका अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन शिवसेना नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी केले आहे.


गुजरातमधील द्वारका किनारपट्टीवर समुद्राला उधाण आले असून मोठमोठ्या लाटा या ठिकाणी उसळत आहेत.


मुंबई, नवी मुंबईत काही परिसरात वादळी वाऱ्यामुळे झाडे कोलमडून पडली आहेत.


रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील गिमगाव येथे वाऱ्याच्या जोरामुळे झाड कोसळून पडले.

दापोली

चक्रीवादळाचा परीघ ६० किमीचा असून हे चक्रीवादळ धडकताना ताशी ११० किमीच्या वेगाने आला. रायगड जिल्ह्यातील रोह्यामध्ये घरांचे पत्रे उडाले.


अलिबागनंतर या चक्रीवादळाचा प्रवास मुंबई, ठाण्याच्या दिशेने होत आहे.


दिवेआगार, श्रीवर्धन, रेवदांडा या रायगड जिल्ह्यातील परिसरात निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा पाहायला मिळत आहे.


‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार हे ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात असून दूरध्वनीद्वारे वेळोवेळी सद्यस्थितीचा आढावा घेत आहेत. कोकण विभागाचे विभागीय आयुक्त लोकेशचंद्र हेदेखील उपमुख्यमंत्र्यांना सद्यस्थितीची माहिती देत आहेत. वादळाचा जोर ओसरेपर्यंत कोकण किनारपट्टीवरील नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.


निसर्ग चक्रीवादळ जमिनीला धडकण्याची प्रक्रिया सुरू झाली असून निसर्ग चक्रीवादळाचे केंद्र आता किनारपट्टीजवळ धडक दिली आहे. ही माहिती भारतीय वेधशाळेची दिली. काही तासात वादळ पूर्णपणे जमिनीवर असणार, चक्रीवादळ अलिबागपासून काही कि.मी.अंतरावर आहे.


मुंबई पोलिसांनी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर वरळी सिंक येथून वाहतुकीला मज्जाव केला आहे.


मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील काही ठिकाणी झाडं उन्मळून पडल्याचे पाहायला मिळत आहे.


‘निसर्ग’ चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीला धोका निर्माण झाला असून प्रशासनासोबत राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उभे रहावे असे आदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहेत.


मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल चहल डिझास्टर कंट्रोल रुममध्ये दाखल झाले असून परिस्थितीचा आढावा घेत आहेत.


निसर्ग चक्रीवादळ कोकण आणि मुंबई किनारपट्टीवरून पुढे मध्य भारताकडे सरकणार आहे. मात्र, गुजरात-महाराष्ट्र सीमेवरच्या वलसाड आणि नवसारी या किनारी भागांमध्ये देखील त्याचा प्रभाव जाणवू शकतो. त्यामुळे वलसाडमधल्या ३५ गावांमधल्या १०००० नागरिकांना तर नवसारीमधल्या १२ गावांमधल्या १०२०० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. आत्तापर्यंत किनारी भागांमध्ये NDRFच्या १४ टीम तैनात करण्यात आल्या आहेत. (सविस्तर वाचा)


निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर वाघ, बिबट्या, हायना इत्यादी सर्व प्राण्यांना त्यांच्या शेजारच्या ठिकाणी हलवल्या येत आहे. अतिवृष्टीमुळे झाडं उन्मळून पडण्याची शक्यता असल्याने प्राण्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो. त्यामुळे सुरक्षिततेचे उपाय म्हणून प्राणीसंग्रहालयातील या प्राण्यांना आपत्कालीन पथकाच्या सहाय्याने सुरक्षित ठिकाणी हलवले जात आहे.


मुंबईतील अग्निशमन दल निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सज्ज झाली असून ९३ लाईफगार्ड सहा समुद्रकिनाऱ्यावर तैनात करण्यात आले आहे.


मुंबईतील वर्सोवा कोळीवाडा परिसरात कोळीबांधवांची सर्वाधिक लोकसंख्या असून येथील कच्च्या घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.


भारतीय हवामान खात्याचे उपसंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी निसर्ग चक्रीवादळ ताशी ८० ते ९० किमी वेगाने कोकण किनारपट्टीच्या दिशेने येत असल्याची माहिती दिली.


निसर्ग चक्रिवादळ आज महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकणार आहे. या चक्रीवादळाचा परिणाम रेल्वे आणि हवाई प्रवासावरही झाला आहे. मध्य रेल्वेने मुंबईकडून धावणाऱ्या अनेक गाड्यांचं वेळापत्रक बदललं आहे. काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटणार्‍या ५ गाड्यांचे वेळापत्रक निश्चित करण्यात आलं आहे, तर मुंबई टर्मिनसला जाणाऱ्या दोन गाड्यांचे नियमन केलं जाईल आणि एक रेल्वे वळवण्यात आली आहे. (सविस्तर वाचा)


निसर्ग चक्रीवादळाचे आयएमडीकडून प्रसारित झालेले चित्र


अरबी समुद्रात निर्माण झालेलं निसर्ग चक्रीवादळ आज दुपारपर्यंत महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर विशेषत: अलिबाग, पालघर परिसरात धडकण्याची शक्यता लक्षात घेऊन मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह किनारपट्टीवरील नागरिकांनी घरातंच किंवा सुरक्षित ठिकाणी आसरा घेऊन थांबावं. वादळाचा जोर ओसरेपर्यंत बाहेर पडण्याचा प्रयत्न करु नये, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. चक्रीवादळापासून जिवितहानी, वित्तहानी होऊ नये म्हणून प्रशासनानं संपूर्ण दक्षता घेतली आहे. आवश्यकतेनुसार नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. लाईफगार्ड, पोलिस, अग्निशमन दल, एनडीआरएफचे जवान सज्ज ठैवण्यात आहेत. आरोग्य यंत्रणा, स्थानिक प्रशासनही दक्ष आहे. राज्याची संपूर्ण तत्पर असून आवश्यकतेनुसार तात्काळ मदत उपलब्ध करण्याचं नियोजन झालं आहे. या वादळाचा वेग आणि ताकद मोठी असल्यानं नागरिकांनी सावध, सुरक्षित रहावं, प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं, असं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे.


निसर्ग चक्रीवादळामुळे पावसाचा जोर वाढला असून अलिबागमध्ये मागील २४ तासात जिल्ह्यात १७ मिमीच्या सरासरीने पाऊस पडला आहे. तर माथेरान (३४), पेण (३८), कर्जत (२९), अलिबाग (२७) या ठिकाणी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.


मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्राच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुते यांनी निसर्ग चक्रीवादळाची सद्यस्थिती सांगितली.

निसर्ग चक्रीवादळ वेगाने अलिबाग, मुंबईच्या जवळ येत आहे.

मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्राच्या शुभांगी भुते यांनी निसर्ग चक्रीवादळाची सद्यस्थिती सांगितली

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಮಂಗಳವಾರ, ಜೂನ್ 2, 2020


निसर्ग चक्रिवादळ महाराष्ट्रावर धडकणार आहे. ताशी १२० किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत. यामुळे मुके प्राणी घाबरुन ते तुमच्या घरात, कॉलनीत आसरा घ्यायला येतील. तर त्यांना घरात, कॉलनीत घ्या. त्यांना असरा द्या, असं आवाहन प्राणीप्रेमी करत आहेत. चक्रिवादळाचा फटका माणसांप्रमाणेच मुक्या प्राण्यांना देखील बसणार आहे. चक्रिवादळामुळे समुद्र किनाऱ्यांवर कासव, डॉल्फिन, व्हेल किंवा सागरी जीव वाहून येऊ शकतो. जर तुम्हाला असं काही निदर्शनास आलं तर याबाबतची माहिती वनविभाग खात्याला द्या, असं आवाहन करण्यात आलं आहे. (सविस्तर वाचा)


मुंबईतील मरिन ड्राईव्ह येथेही चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेचा उपया म्हणून बॅरगेट्स टाकण्यात आले आहे. समुद्राला उधाण आल्यानंतर मोठ्या प्रमाणात लाटा उसळण्याची शक्यता वर्तवली जात असून हे खबरदारीचे उपाय करण्यात आले आहेत.


रत्नागिरी जिल्ह्यात रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरूवात झाली असून दुपारी अतिवृष्टीचा इशारा आयएमडीकडून देण्यात आला आहे.


निसर्ग चक्रीवादळ अलिबागच्या दिशेने मुंबई, पालघर असा प्रवास करणार असून अलिबागमधील साधारण १५०० स्थानिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.


मुंंबई पोलीसांनी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कलम १४४ लागू केले असून कोणीही नको ते धाडस न करण्याचा सल्ला दिला आहे.


केंद्र सरकारनेही निसर्ग चक्रीवादळाचा आढावा घेतला असून हे वादळ जलद गतीने महाराष्ट्र राज्याच्या दिशेने येत आहे.  या वादळाचा वेग वाढत असून ८५ ते ९५ किमी प्रतीतास हे वादळ पुढे सरकत आहे.


भारतीय हवामान विभागाकडून निसर्ग चक्रीवादळाचे तासातासाला अपडेट्स दिले जाणार आहेत


मीरा भाईंदरच्या उत्तन गावात एनडीआरएफची टीम दाखल झाली असून येथील गावकऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे.


रत्नागिरीच्या किनारपट्टीवर जोरदार वारे वाहू लागले असून काल रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे.


केंद्रीय मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनीही अरबी समुद्रात घोंघावत असणाऱ्या निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, दक्षिण गुजरातच्या सागरी किनाऱ्यावर सतर्कतेचा इशारा दिला आहे.


निसर्ग चक्रीवादळ अधिक वेगाने अलिबागच्या दिशेने येत असून दुपारी ३ च्या ऐवजी एक वाजताच ते धडकू शकते, असे सांगितले जात आहे. सध्या ताशी १०० ते १५० किमी वेगाने हे वादळ येत आहे.


आंध्र प्रदेशमध्ये दाखल झालेली एनडीआरएफची तुकडी आज पहाटे मुंबई दाखल झाली आहे. निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफला मुंबईत पाचारण करण्यात आले आहे.


अलिबाग, मुंबई, पालघर नंतर हे वादळ गुजरातच्या दिशेने जाणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत असून त्या पार्श्वभूमीवर गुजरातमधील समुद्र किनाऱ्यांवरदेखील एनडीआरएफची टीम तैनात करण्यात आली आहे.


निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील विविध गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या ठिकाणी एनजीआरएफची टीम तैनात करण्यात आली आहे. तर अलिबागमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (सविस्तर वाचा)


मुंबईसह, अलिबाग, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या समुद्रकिनारी असलेल्या जिल्ह्यांवर निसर्ग चक्रीवादळाचे संकट घोंघावत आहेत. कालपासूनच या परिसरात मुसळधार पावसाला सुरूवात झाली असून समुद्र किनाऱ्यावर राहणाऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईच्या दिशेने ताशी २५० किमीने हे वादळीवारे येत असून अलिबागच्या दिशेने हे वादळ येण्याची शक्यता आयएमडीच्या वतीने वर्तवण्यात आली आहे. (सविस्तर वाचा)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -