घरमहाराष्ट्रभाजपला मदत करण्यासाठी दाऊद सरेंडरची चर्चा आणली जातेय - नवाब मलिक

भाजपला मदत करण्यासाठी दाऊद सरेंडरची चर्चा आणली जातेय – नवाब मलिक

Subscribe

प्रकाश आंबेडकर यांनी दाऊद प्रकरणावरून शरद पवार यांच्यावर टीका केली. या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी उत्तर दिले आहे.

भाजपला मदत करण्यासाठी वारंवार ही चर्चा समोर आणली जात आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर दाऊदला परत आणण्यास विरोध केल्याचे वक्तव्य केले होते. गेली २५ वर्षे दाऊदला भारतात का आणले नाही? ही चर्चा करण्यात येत आहे. परंतु शरद पवार साहेबांनी आपली स्पष्ट भूमिका यावर मांडलेली आहे. जो आरोपी फरारी आहे, अशा आरोपीला शर्तीवर सरेंडर केले जात नाही. त्यावेळी सरकारने मान्यता दिली नाही. ज्या अटी राम जेठमलानी सांगत होते. त्या सरकारला मान्य नव्हत्या. त्याबाबत शरद पवार साहेबांनी वारंवार खुलासा केला आहे, असेही नवाब मलिक म्हणाले.

हे वाचा – शरद पवारांनी दाऊदचे सरेंडर नाकारले; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप

- Advertisement -

राम जेठमलानी जर सच्चे देशभक्त होते तर त्यांनी दाऊदला भेटल्यानंतर इंटरपोलला का माहिती दिली नाही? त्यानंतर राम जेठमलानी केंद्रीय मंत्री झाले. राज्यात आणि केंद्रात भाजपचं सरकार आहे. त्यावेळी दाऊदला सरेंडर करुन का घेतले नाही? त्यांनी या सरकारशी चर्चा का केली नाही? असा सवालही नवाब मलिक यांनी केला.

प्रकाश आंबेडकर हे २५ वर्षानंतर हा प्रश्न काढत आहेत. आता वंचित आघाडीचे नेते बी. जी.कोळसे पाटील हे सांगत आहेत की, वेगळी निवडणूक लढणे म्हणजे भाजपला आणि आरएसएसला मदत करण्यासारखे आहे. तरिही प्रकाश आंबेडकर स्वतंत्र निवडणूक लढवत आहेत, असेही नवाब मलिक म्हणाले. आज जो प्रश्न निर्माण करण्यात आला. तो कुणासाठी, कुणाला मदत करण्यासाठी आहे? असा सवालही नवाब मलिक यांनी उपस्थित केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -