घरमहाराष्ट्रखेडमधील दाऊदच्या १४ मालमत्तांचा होणार लिलाव

खेडमधील दाऊदच्या १४ मालमत्तांचा होणार लिलाव

Subscribe

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला पुन्हा एकदा फटका बसला आहे. दाऊदच्या रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील १४ मालमत्ता लिलावात काढण्यात आल्या आहेत.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला पुन्हा एकदा फटका बसला आहे. दाऊदचा रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील १४ मालमत्ता लिलाव काढण्यात आल्या आहेत. अलिकडेच दाऊद याची बहिण हसीना पारकर हिचा नागपाडा येथील फ्लॅटचा १.८ कोटी रूपयांना लिलाव करण्यात आला होता. तर आता दाऊच्या खेड येथील मालमत्तांचेही लिलाव होणार आहे. खेडमधील दाऊदच्या मालमत्ता त्याच्या आई आणि बहिण हसीनाच्या नावे आहेत. दाऊदच्या या मालमत्ता अँटी स्मगलिंग या एजन्सीकडून लिलावात करण्यात येणार आहे.

दाऊदच्या मालमत्ता लिलावात

अँटी स्मगलिंग या एजन्सीने पूण्यातील जिल्हा मूल्यनिर्धारण अधिकाऱ्याला दाऊदच्या १४ मालमत्तांची लिलावाची किंमत ठरविण्यास सांगितले आहे. तसेच या सर्व मालमत्तेमध्ये तीन बंगले आहेत. त्यामधील एक बंगला तीन मजल्याचा आहे. त्या शिवाय पेट्रोल पंपासाठी एक प्लॅटही आहे. या सर्वमालमत्ता गुन्हेगारी करून मिळवलेल्या पैशातून या मालमत्ता दाऊदने खरेदी केले असल्याने या मालमत्तांना लिलावात काढण्यात आल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -