घरताज्या घडामोडीधक्कादायक! डॉक्टरच्या चुकीमुळे कोरोनाग्रस्ताचा मृत्यू

धक्कादायक! डॉक्टरच्या चुकीमुळे कोरोनाग्रस्ताचा मृत्यू

Subscribe

डॉक्टरच्या चुकीमुळे एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे अनेकांचे बळी जात आहेत. मात्र, रत्नागिरीमध्ये एका डॉक्टरच्या चुकीमुळे एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी खासगी रुग्णालयाच्या डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, अद्याप या डॉक्टराला अटक करण्यात आलेली नाही.

नेमके काय घडले?

एखाद्या रुग्णामध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास त्या रुग्णाला तात्काळ सरकारी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात यावे, असे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, असे असताना देखील रत्नागिरीमधील एका डॉक्टराने कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णावर एका खासगी रुग्णालयात उपचार केले. मात्र, त्या रुग्णाची प्रकृती खालवल्यानंतर त्या रुग्णाला ६ एप्रिलला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याचदिवशी कोरोनामुळे रुग्णाचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. दरम्यान, डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, डॉक्टराला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

- Advertisement -

रुग्णाविषयी थोडक्यात

हा रुग्ण १८ मार्च रोजी दुबईहून घरी आला होता. आठ दिवसानंतर त्याला ताप, सर्दी आणि खोकला अशी कोरोनाची लक्षणे आढळून आली. त्यामुळे हा रुग्ण एका खासगी रुग्णालयात गेला आणि त्या रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला रुग्णालयात दाखल करुन घेतले, अशी माहिती जिल्हाधिकारी मिश्रा यांनी दिली. मात्र, खासगी रुग्णालयात उपचार न झाल्याने त्या रुग्णाला जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. मात्र, त्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या १९ जणांना क्वॉरंटाइन करण्यात आले. यासोबत गावासह आजूबाजूचा तीन किमी परिसर देखील सील करण्यात आला आहे.


हेही वाचा – LockDown: वाधवानप्रकरणी अमिताभ गुप्ता सक्तीच्या रजेवर; गृहमंत्र्यांचे आदेश

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -