घरमहाराष्ट्र'यांना समाजात कवडीची किंमत नाही', अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला

‘यांना समाजात कवडीची किंमत नाही’, अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला

Subscribe

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखले जातात. एरवी फार काही न बोलणारे अजित पवार एखाद्यावर घसरले की कडाडून टीका करतात. पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पुण्या घेण्यात आलेल्या मेळाव्यादरम्यान आज अजित पवारांनी विरोधकांवर खरपूस टीका केली. गेल्या काही दिवसांपासून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सातत्याने शरद पवार यांच्यावर टीका करत होते. या टीकेचा समाचार आज अजित पवार यांनी घेतला. “काही लोक काहीही बरळायला लागली आहेत. विशेष करुन विरोधी पक्षातील नेते खालच्या पातळीवर जाऊन बोलतायत. त्यांना समाजात किती किंमत आहे? तोल गेलेल्या सारखी वक्तव्ये करणाऱ्यांना अधिक किंमत देण्याची गरज नाही”, अशा शब्दात अजित पवार यांनी टीका केली.

शरद पवार यांच्यावर टीका करणे म्हणजे सुर्यावर थुकण्यासारखे आहे. शरद पवारांवर बोलण्याइतकी आपली किंमत आहे का? असा टोला देखील अजित पवार यांनी लगावला. भाजपचे नेते खालच्या पातळीवर जाऊन टीका करायला लागली आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणाला सुसंस्कृतपणाची परंपरा आहे. पण काहीजण राजकारणासाठी काहीही करत आहेत. आपण कोणाबद्दल काय बोलतो, हे विरोधी पक्षाच्या काही लोकांना कळत नाहीये, असेही अजित पवार म्हणाले.

- Advertisement -

दिवाळीच्या गर्दीत कोरोना चेंगरून मेला

या मेळाव्यानंतर अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना दिवाळीत झालेल्या गर्दीवर आपल्या शैलीत खुमासदार टीका केली. पुण्यातील काही भागांत दिवाळीदरम्यान प्रचंड गर्दी झाली होती. त्यामुळे दिवाळीनंतर कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. नागरिसांनी सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन केल्यास कोरोना नियंत्रणात राहू शकतो, तेव्हा नियम पाळा, असे आवाहन देखील अजित पवार यांनी केले.

“कोरोनाची लस आज येणार उद्या येणार… अशा बातम्या रोज वाचायला मिळत आहेत. पण लस नक्की कधी येणार. आता माणसे मरायला टेकली आहेत, लस अजून यायला तयार नाही. त्यामुळे नागरिकांनीच खबरदारी घेण्याची गरज आहे”, असेही अजित पवार म्हणाले. पुढच्या काही दिवसांत राज्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन कोरोनाच्या परिस्थितीबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचेही ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -