घरमहाराष्ट्रमुंबईच्या आमदारांच्या खोलीतच सापडला मृतदेह

मुंबईच्या आमदारांच्या खोलीतच सापडला मृतदेह

Subscribe

मुंबईचे आमदार रमेश लटके यांच्या नागपूर निवासातील ४६ नंबरच्या खोलीत एक मृतदेह आढळला आहे. विनोद अगरवाल असे या व्यक्तीचे नाव असून ते लटके यांचे पीए असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र, ते आपले पीए नसल्याचा दावा लटके यांनी केला आहे.

नागपूरमध्ये सध्या पावसाळी अधिवेशनाची गडबड सुरू आहे. मात्र, या गडबडीतच एका धक्कादायक बातमीमुळे नागपूर हादरले. नागपूरच्या आमदार निवासात एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्यामुळे खळबळ माजली. धक्कादायक बाब म्हणजे हा मृतदेह मुंबईतील अंधेरीचे आमदार रमेश लटके यांच्याच खोलीत सापडल्याने अनेक चर्चांना सुरूवात झाली. मृत व्यक्तीचे नाव विनोद अगरवाल असल्याची माहिती समोर येत असून ही व्यक्ती रमेश लटकेंच्या खोलीत कशी पोहोचली? विनोद अगरवाल नक्की कोण आहेत? त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, अगरवाल हे लटके यांचे पीए असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, ते आपले पीए नसल्याचं स्पष्टीकरण आमदार लटके यांनी दिलं आहे.

रूम नंबर ४६मध्ये झाला मृत्यू

आमदार निवासमध्ये सापडलेल्या या मृतदेहामुळे अनेक तर्क-वितर्क सुरू झाले होते. नागपूरच्या आमदार निवासामध्ये रूम नंबर ४६ मध्ये विनोद अगरवाल यांचा मृतदेह सापडला आणि एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच तातडीने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रकरणाचा तपास सुरू केला. मात्र, विनोद अगरवाल यांचा मृत्यू ह्रदयविकाराच्या झटक्याने झाल्याचं समोर आलं. तसेच, ही व्यक्ती माझी पीए नव्हती अशी प्रतिक्रिया आमदार रमेश लटके यांनी ‘माय महानगर’शी बोलताना दिली.

विनोद अगरवाल हे वयस्कर सदगृहस्थ माझ्याकडे काम मागण्यासाठी आले होत. त्यांना काम मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नही करत होतो. मात्र, त्यांना काही शारिरीक व्याधी असल्यामुळे ते कठीण होत होतं. काम मिळेपर्यंत त्यांना मी आमदार निवासामधल्या माझ्या खोलीत राहाण्याची परवानगी दिली होती. मात्र, आज सकाळी ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.

रमेश लटके, आमदार, शिवसेना

- Advertisement -

दरम्यान, ऐन पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावरच ही घटना घडल्यामुळे आमदार निवास परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण होतं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -