पीएमसी बँकेच्या २ खातेदारांचा मृत्यू

Mumbai
pmc bank
पीएमसी बँक

पीएमसी बँकेच्या आणखी एका खातेदाराचा मंगळवारी मृत्यू झाला. फात्तोमल पंजाबी असे मृत व्यक्तीचे नाव असून दुपारी १२.३०च्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले. ते ६१ वर्षांचे होते. पीएमसी बँकेवर निर्बंध लादल्यामुळे त्यांचे पैसे बँकेत अडकले होते. त्यामुळे ते गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ होते.

मंगळवारी दुपारी १२.३० वाजता फात्तोमल पंजाबी हे बँकेत जाण्यासाठी घरातून निघाले होते. मात्र तेव्हा त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे ते घरी थांबले. त्यांना शेजार्‍यांनी गोकुळ हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पण हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे तेथे पोहचताच त्यांचा मृत्यू झाला. फात्तोमल पंजाबी मुलुंडमध्ये रहायचे. त्यांच्या कॉलनीत राहणार्‍या ९५ टक्केे नागरिकांची पीएमसी बँकेत अकांऊट आहेत. सोमवारी ५१ वर्षीय संजय गुलाटी यांचा हृदय बंद पडल्याने मृत्यू झाला. ते सुद्धा पीएमसी बँकेचे खातेदार होते. पीएमसी बँकेतील भ्रष्टाचाराप्रकरणी आंदोलन करून घरी परतल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. संजय गुलाटी ओशिवरामध्ये राहत होते.

ओशिवरामधील पीएमसी बँकेच्या शाखेत त्यांचं खातं होतं. जवळपास ९० लाख रुपये त्यांचे बँकेत अडकले होते. संजय गुलाटी यांना एकमागोमाग एक अनेक धक्के मिळत होते. संजय गुलाटी जेट एअरवेजचे कर्मचारी होते. पण एप्रिल महिन्यात त्यांची नोकरी गेली. यानंतर बचत केलेल्या पैशांमधून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. पण याचवेळी पीएमसी बँकेतील घोटाळ्याची बातमी समोर आली. संजय गुलाटी यांनी पीएमसी बँकेत ९० लाख रुपये जमा केले होते. पीएमसी घोटाळ्याची माहिती मिळताच त्यांची झोप उडाली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here