घरमहाराष्ट्रदेवेंद्र फडणवीस यांच्या पुनर्विचार याचिकेवर निर्णय राखीव

देवेंद्र फडणवीस यांच्या पुनर्विचार याचिकेवर निर्णय राखीव

Subscribe

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात दोन फौजदारी गुन्ह्यांची माहिती लपवल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. फडणवीस यांच्या पुनर्विचार याचिकेवर सुप्रीम कोर्टाने निकाल राखून ठेवला आहे. याप्रकरणी 20 फेब्रुवारीला फडणवीसांना जेएमएफसी कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

देवेंद्र फडणवीसांच्या पुनर्विचार याचिकेवर सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने जेएमएफसी न्यायालयात सुनावणी सुरु आहे. या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने निकाल राखून ठेवला आहे. तसेच 20 फेब्रुवारीला स्वत: फडणवीसांना जेएमएफसी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहे. 2014 मधील विधानसभा निवडणुकीवेळी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात दोन फौजदारी खटल्यांची माहिती लपवल्याचा आरोप आहे. नागपूरमधील वकील सतीश उके यांनी याप्रकरणी याचिका दाखल केली आहे. 2014 मधील विधानसभा निवडणुकीवेळी 1996 आणि 1998 या दोन वर्षाच्या फौजदारी गुन्ह्यांची माहिती शपथपत्रात दिली नाही असा आरोप याचिकाकर्ते सतीश उके यांनी केला आहे.

- Advertisement -

सतीश उके यांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधातील बदनामी आणि फसवणूक असे दोन्ही गुन्हे नागपूरमधील आहेत. 2014 ची विधानसभा निवडणूक लढवताना देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात या दोन्ही गुन्ह्यांची माहिती लपवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. फडणवीस यांनी खोटे प्रतिज्ञापत्र सादर केले होते, त्यामुळे त्यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -