घरमहाराष्ट्रपुनश्च हरी ओम: ठाकरे सरकार मुंबई-दिल्ली विमान आणि रेल्वेसेवा बंद करणार?

पुनश्च हरी ओम: ठाकरे सरकार मुंबई-दिल्ली विमान आणि रेल्वेसेवा बंद करणार?

Subscribe

दिल्लीमध्ये कोरोनाची तिसरी लाट आल्यानंतर कोरोना संसर्ग वेगाने वाढत चालला आहे. त्यामुळे दिल्ली सरकारने पुन्हा काही निर्बंध लादले असून आता होम टू होम सर्वेक्षण सुरु केले आहे. मात्र त्याचवेळी ठाकरे सरकार महाराष्ट्रात संसर्ग पसरू नये यासाठी मुंबई आणि दिल्ली दरम्यानची विमान आणि रेल्वे सेवा बंद करण्याच्या विचारात आहे. लवकरच याबाबत मोठा निर्णय राज्य सरकार घेईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

कोरोनामुळे अनेक दिवस देशात लॉकडाऊन लागल्यानंतर केंद्र सरकारने लॉकडाऊन एक ते पाचमध्ये हळुहळु काही गोष्टींना परवानगी दिली. सध्या देशभरात लॉकडाऊन पुर्णपणे संपलेला आहे. त्यामुळे उद्योग, व्यापार रुळावर आला असून दिवाळीनिमित्त मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर दिसले. त्यामुळेच गेल्या काही दिवसापासून दिल्लीत कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली पाहायला मिळाली. त्यामुळे चिंतेत असलेल्या महाराष्ट्र सरकारने दिल्ली-मुंबई विमान, रेल्वे वाहतुकीवर निर्बंध घालण्याचा विचार केला आहे.

- Advertisement -

मात्र हा निर्णय घेत असताना प्रवाशांना ४८ तासांचा वेळ दिला जाईल. शुक्रवारी सकाळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली. यानंतर अधिकाऱ्यांनी सांगितले की, या प्रस्तावावर अद्याप विचार सुरु आहे. जोपर्यंत दिल्लीतील परिस्थिती नियंत्रणात येत नाही, तोपर्यंत वाहतूक व्यवस्थेवर निर्बंध घालावेत, असा एक पर्याय समोर येताना दिसत आहे. दिल्लीमध्ये कोरोनामुळे ८ हजार लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. मागच्या २४ तासांत ९८ लोकांचा बळी गेल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -