घरमहाराष्ट्रधानोरी येथील दगड खाणीच्या ठिकाणचे आरक्षण रद्द करण्याची मागणी

धानोरी येथील दगड खाणीच्या ठिकाणचे आरक्षण रद्द करण्याची मागणी

Subscribe

या जागेचा टिडीआर देण्याचा निर्णय झाला नाही, हा प्रस्ताव प्राथमिक स्तरावर असल्याचा खुलासा प्रशासनाकडून केला गेला

धानोरी येथील दगड खाणीच्या ठिकाणी साहसी जलक्रीडा केंद्राचे आरक्षण रद्द करावे, अशी मागणी विरोधी पक्षांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत केली. तर या जागेचा टिडीआर देण्याचा निर्णय झाला नाही, हा प्रस्ताव प्राथमिक स्तरावर असल्याचा खुलासा प्रशासनाकडून केला गेला. धानोरी येथील दगड खाणीच्या जागेचा टिडीआर देण्याचा विषय गेल्या तीन दिवसांपासून ऐरणीवर आला आहे. सुमारे ३०० कोटी रुपयांहून अधिक मूल्याचा टिडीआर यातून निर्माण होणार आहे.

इतरांच्या फायद्यासाठी प्रस्ताव

दगड खाण जागेच्या ठिकाणी टाकण्यात आलेले आरक्षणच चुकीचे असल्याचा आरोपसुद्धा विरोधी पक्षाने केला आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत विरोधी पक्षाने हे आरक्षण रद्द करण्याची मागणी करणारे फलक झळकवले होते. विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांनी प्रशासनावर टिका करताना या जागेचा आपल्याला उपयोग होणार नाही तरीही तेथे आरक्षण टाकले गेले, असा आरोप केला. या प्रकल्पामुळे महापालिकेचे नुकसान होणार आहे. शहरांत असलेले कात्रज तलाव, सारसबाग येथील तळे, लकाकी तळे, पाषाण येथील तलावांकडे महापालिकेचे दुर्लक्ष केले आहे. टिडीआरचा प्रस्ताव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोणाच्यातरी आर्थिक फायद्यासाठी हा विषय केला जात आहे’’ असा आरोप बराटे यांनी केला.

- Advertisement -

हेही वाचा – डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची सहावी पुण्यतिथी; अजूनही मारेकरी मोकाट

प्रत्येक ठिकाणी टिडीआर द्यावा लागेल

बावधन भागातही अशाच प्रकारच्या दगड खाणी आहे. यापैकी एक खाण बांधकाम व्यावसायिकाने विकत घेतली. ती खाण बुजवून तेथे रस्ता केला असून, याबाबत महापालिकेकडे तक्रार केली होती. त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही, अशी माहिती दिली. याबाबत प्रशासनाने त्यावर खुलासा करावा, अशी मागणी नगरसेवक दिलीप वेडे – पाटील यांनी केली. तर मनसेचे गटनेते यांनी पुणे शहराच्या दक्षिण भागात अनेक दगड खाणी आहेत. तुम्ही एका ठिकाणी टिडीआर दिला तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला टिडीआर द्यावा लागेल असा धोका त्यांनी व्यक्त केला. नगर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी या विषयावर प्रशासनातर्फे खुलासा केला. ते म्हणाले की, ”धानोरी सर्व्हे ४७ येथील जागा १९८७ च्या विकास आराखड्यात निवासी दाखविण्यात आली होती. याठिकाणी अॅक्वा स्पोर्ट्सचे आरक्षण टाकण्यात आले आहे. ते शासनाने मान्य केले आहे. वीस एकर क्षेत्रावर असलेल्या आरक्षणापोटी ताबा देण्याकरीता संबंधित जागा मालकाने जानेवारी २०१९ मध्ये
प्रस्ताव दाखल केला. त्याचे टायटल सर्च सुरू असून, टिडीआर देण्यासंदर्भात अद्याप अंतिम निर्णय घेतला गेला नाही. ही जागा ताब्यात घेताना सर्वसाधारण सभेत होणाऱ्या चर्चेचा विचार करून प्रशासन निर्णय घेईल.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -