घरमहाराष्ट्रदरमहा ३५ किलो धान्य देण्याची मागणी

दरमहा ३५ किलो धान्य देण्याची मागणी

Subscribe

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना वितरणाचे प्रमाण वाढून अंत्योदय योजनेसाठी दरमहा ३५ किलो धान्य प्रती कार्ड आणि प्राधान्य कुटुंबातील लाभार्थींसाठी ४ किलो तांदूळ, तसेच १ किलो गहू प्रती व्यक्ती देण्यात यावे, अशी मागणी तालुका रास्तभाव धान्य दुकानदार संघटनेने केली आहे.

यावर्षी अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे आलेल्या पिकाचे अतोनात नुकसान झाले असून, यावर्षी साधारण ४० टक्के पीक हातात आलेले आहे. काही शेतकर्‍यांचे १०० टक्के नुकसान झालेले असल्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम २०१३ मधील निकषानुसार उत्पन्न मर्यादेनुसार देण्यात आलेल्या केशरी शिधापत्रिका धारकांना किमान दोन वर्षे तरी प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी योजनेमध्ये समाविष्ट समाविष्ट करून या योजनेचा लाभ देण्याची विनंती करण्यात आली आहे.

- Advertisement -

या संदर्भातील निवेदन संघटनेने जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके आणि तहसीलदार सचिन शेजाळ यांना सादर केले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष संजय कामेरकर, उपाध्यक्ष सुभाष वागळे, सचिव रवींद्र सावणेकर, खजिनदार कौस्तुभ जोशी, सदस्य भगवान पिंगळे, परदेशी थळे, राजेंद्र पाटील, देवेंद्र तांबोळी, अमृता ठोंबरे, तसेच अन्य रास्तभाव धान्य दुकानदार उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -