घरमहाराष्ट्रभाजपकडून कर्नाटकात लोकशाहीची गळचेपी - बाळासाहेब थोरात

भाजपकडून कर्नाटकात लोकशाहीची गळचेपी – बाळासाहेब थोरात

Subscribe

कर्नाटक विधानसभेत मांडण्यात आलेला विश्वासदर्शक ठराव अखेर कुमारस्वामी सरकार हरलं असून आता त्यावर काँग्रेसमधून टिकेचा सूर उमटत आहे.

कर्नाटकमध्ये गेल्या कित्येक दिवसंपासून सुरू असलेला राजकीय ड्रामा अखेर संपला असून काँग्रेस-जनता दलाचं सरकार ९९ विरुद्ध १०५ अशा फरकाने पडलं आहे. त्यामुळे आता कर्नाटकमध्ये भाजपचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेतेमंडळींकडून भाजपच्या या ऑपरेशन लोटसवर टीका केली जात आहे. ‘लोकशाही पद्धतीने निवडून आलेले कर्नाटकमधील काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे सरकार अनैतिक पद्धतीने पाडून भाजपने लोकशाहीची गळचेपी केली आहे’, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

‘भाजपच्या काळात लोकशाही धोक्यात’

या संदर्भात बोलताना थोरात म्हणाले की, ‘भाजपने नैतिकता गुंडाळून ठेवली आहे. कोणत्याही मार्गाने सत्ता मिळवणे हेच मोदी शाह यांचे अंतिम ध्येय आहे. त्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात हे संपूर्ण देश गेल्या १५ दिवसांपासून पाहात आहे. हुकुमशाही मानसिकतेच्या भाजप नेत्यांचा विरोधी पक्षाचे सरकार चालू न देणे हा एकमेव अजेंडा आहे. याकरता साम, दाम, दंड, भेद नितीचा वापर सर्रास सुरु आहे. गोवा, मणिपूर, अरुणाचल प्रदेशमध्ये हीच निती वापरून भाजपने सत्ता मिळवली. भाजपने काँग्रेस आमदारांना खासगी विमानाने मुंबईत आणून पंचतारांकीत हॉटेलात त्यांची बडदास्त ठेवली गेली. त्यासाठी कोट्यवधी रूपयांची उधळपट्टी करण्यात आली. ही लोकशाहीची गळचेपी असून भाजपच्या काळात लोकशाही धोक्यात आली आहे’, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

- Advertisement -

वाचा सविस्तर – कर्नाटकमधील कुमारस्वामी सरकार गडगडले, विश्वासदर्शक ठराव हरले!

काँग्रेसनं ‘या’साठी लांबवली प्रक्रिया?

कर्नाटकमध्ये आपली सत्ता जाणार हे काँग्रेस आणि जनता दलाच्या सरकारला माहिती होतं, मात्र भाजप सत्ता मिळवण्यासाठी काय करू शकतो, हे जनतेपुढे आणण्यासाठीच ही प्रक्रिया इतकी लांबवण्यात आली अशी प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून आता येऊ लागली आहे. दरम्यान, कर्नाटकमध्ये भाजप आमदार आणि नेते येडीयुरप्पाच मुख्यमंत्री होतील हे जवळपास निश्चित झालं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -