घरमहाराष्ट्रराज्यातील १६ आदिवासी जिल्ह्यांत 'दंत महाआरोग्य' शिबीर

राज्यातील १६ आदिवासी जिल्ह्यांत ‘दंत महाआरोग्य’ शिबीर

Subscribe

राज्यातील आदिवासी भागातील रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून सेवा मिळावी यासाठी १६ जिल्ह्यांमध्ये दंत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलं आहे. आज पासून या शिबिराला सुरूवात झाली आहे.

राज्यातील आदिवासी भागातील रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून सेवा मिळावी यासाठी १६ जिल्ह्यांमध्ये दंत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलं आहे. सोमवारपासून या शिबिराला सुरूवात झाली आहे. २६ ते २९ ऑगस्ट या काळात हे शिबीर राबवलं जाणार आहे. त्यामुळे, या महाआरोग्य शिबिराचा जनतेने लाभ घ्यावा, असं आवाहन आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. दरम्यान, या महाआरोग्य शिबीराचा राज्यस्तरीय शुभारंभ सोमवारी ठाण्यातून करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते याशिबिराचे उद्घाटन होणार आहे.

सोळा जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरीय महाआरोग्य शिबीर

पालघर, ठाणे, रायगड, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, अमरावती, यवतमाळ, नाशिक, नंदुरबार, जळगांव, धुळे, पुणे आणि अहमदनगर या सोळा जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरीय महाआरोग्य शिबीर घेण्यात येणार आहे. तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला, आरोग्य तपासणी, वैद्यकीय चाचण्या, मोफत औषधे आणि उपचार, आवश्यक त्या शस्त्रक्रिया आणि दंतचिकित्सा आदी आरोग्य सुविधा देण्यात येणार आहेत, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

- Advertisement -

संकल्प निरोगी महाराष्ट्राचाया उद्दीष्ट्टपूर्तीसाठी जनसामान्यांपर्यंत आणि समाजाच्या शेवटच्या घटकातील गरजू रुग्णांना १४ प्रकारच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवा या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत. शिबिराच्या ठिकाणी पौष्टिक आहार, सिकल सेल, अॅनेमिया, स्वच्छता आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या विविध कार्यक्रमांबाबत प्रदर्शन स्वरूपात जनजागृती करण्यात येणार आहे. आदिवासी भागातील रुग्णांना तज्ञ डॉक्टरांच्या सेवा देऊन त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात आहे, असंही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं जात आहे.


हेही वाचा – कल्याण-डोंबिवलीमध्ये ‘या’ रुग्णालयात होणार मोफत आरोग्य तपासणी

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -