बाळासाहेबांचे ते स्वप्न साकार करण्याचा निर्धार करुया – अजित पवार

Deputy cm ajit pawar paid homage to balasaheb thackeray

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांचा आज आठवा स्मृतीदिन आहे. या निमित्ताने देशभरातून त्यांना अभिवादन केले जात आहे. आदरांजली वाहिली जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली आहे. यावेळी त्यांनी बाळासाहेबांचे स्वप्न साकार करण्याचा निर्धार करुया असे आवाहन केले आहे.

अजित पवार यांनी बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहिली आहे. “महाराष्ट्राच्या महान नेतृत्वास माझी विनम्र आदरांजली. स्वर्गीय बाळासाहेबांनी त्यांच्या नेतृत्व, कर्तृत्व, वक्तृत्वाच्या बळावर मराठी मनावर कायम अधिराज्य गाजवले. महाराष्ट्राची अस्मिता, मराठी माणसाचा सन्मान आणि सामान्य जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी जीवनभर संघर्ष केला. महाराष्ट्राची सर्वांगीण प्रगती आणि बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना हे बाळासाहेबांचे स्वप्न होते. स्वर्गीय बाळासाहेबांचे हे स्वप्न पूर्ण करण्याचा आपण निर्धार करुया,” असे अजित पवार म्हणाले.

शिवतीर्थावर गर्दी न करण्याचे आवाहन

बाळासाहेब ठाकरे यांचा यांचा आज (१७ नोव्हेंबर) स्मृतीदिन आहे. दरवर्षी या निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यासाठी लाखो शिवसैनिक शिवतीर्थावर जाऊन त्यांना अभिवादन करत असतात. यंदा मात्र कोरोनाचे सावट असल्याने गर्दी करू नका, संयम पाळा, जेथे आहात तिथूनच शिवसेनाप्रमुखांना मानवंदना द्या, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.