घरमहाराष्ट्रमुंबई महापालिकेवर उपमहापौर आमचा - आठवले

मुंबई महापालिकेवर उपमहापौर आमचा – आठवले

Subscribe

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत पाहायला मिळणार रंगत

2022 मध्ये होणार्‍या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून जय्यत तयारी केली जात आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मिशन मुंबईचा’ नारा देत मुंबई महापालिकेवर भाजपचा भगवा फडकवण्याचा चंग बांधला आहे. त्यानंतर आता रिपब्लिकन पक्षाने मुंबई महापालिकेवर पक्षाचा उपमहापौर बसवण्याचे वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत रंगत पाहायला मिळणार आहे.

‘येत्या काळात मुंबई महानगरपालिकेवर जर भाजपचा महापौर असेल, तर आरपीआयचा उपमहापौर असेल,’ असे विधान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले. जर येत्या काळात भाजप स्वबळावर लढणार असली, तर आमचे भाजपला समर्थन असेल. भाजप आणि आरपीआय मिळून शिवसेनेला महापालिकेपासून दूर ठेवू, असेही आठवले यावेळी म्हणाले. तसेच या पार्श्वभूमीवर येत्या काळात मी लवकरच देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे,’ असेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

मनसेसोबत युती नाही -फडणवीस

अमरावतीमध्ये पदवीधर मतदारसंघात प्रचारासाठी आलेले विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मनसेसोबत युती करणार का, असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप स्वबळावर लढणार आहे. कोणासोबत युती करण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -