कंगनाला सोडा, कोरोनावर लक्ष द्या; फडणवीसांचा राज्य सरकारला सल्ला

bjp devendra fadnavis

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर अनेक मुद्यांवरुन टीका केली आहे. राज्य सरकारला कोरोनाशी लढाई संपली आहे, असं वाटतंय. संपूर्ण सरकारी तंत्र कंगनाशी लढाईत गुंतलं आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर केली आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय त्याकडे लक्ष द्या, असा सल्ला देवेंद्र फडणवीसांनी दिला आहे.

राज्यात कोरोना वाढत असताना सगळी यंत्रणा कंगनाच्या मागे लागली आहे.जेवढ्या तत्परतेने कंगनावर कारवाई केली, तेवढा लक्ष राज्यातील कोरोनावर दिला तर बरे होईल. देशातील ४० टक्के मृत्यू हे महाराष्ट्रातील आहेत. याकडे सरकार लक्ष न देता कंगनावर कारवाई करण्यात व्यस्त आहेत. कोरोनाशी लढाई संपली असून आता लढाई कंगनाशी आहे, असं राज्य सरकारला वाटत आहे. कंगना सोडून कोरोनाकडे गांभीर्याने लक्ष द्या, असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. कंगनाचा मुद्दा भाजपाने उचललेला नाही. तुम्ही कशाला कंगनाविरोधात बोलायला सुरुवात केली. राष्ट्रीय स्तरावर जाईल इतकं महत्त्व कशाला दिलं. तुम्ही जाऊन तिचं घर तोडलं, असं फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांनी कंगनाचा भाजपशी संबंध असलेल्या वृत्ताचं खंडन केलं आहे.