घरमहाराष्ट्र२५ हजार हेक्टरीबाबत काय झाले सांगा उद्धवजी!

२५ हजार हेक्टरीबाबत काय झाले सांगा उद्धवजी!

Subscribe

विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची टीका

आमचा विश्वासघात झाला त्याची आम्हाला चिंता नाही, आम्ही लढणारे आहोत, पुन्हा मैदानात जाऊन राज्य परत मिळवू. राज्यात जे सरकार आले आहे, ते जनतेने निवडून दिलेले सरकार नाही. शेतकर्‍यांच्या विश्वासघाताची मालिका या सरकारने सुरू ठेवली आहे. 25 हजार हेक्टरीबाबत काय झाले सांगा उद्धवजी! बांधावर जाऊन तुम्ही घोषणा केली होती. बांधावर जाऊन 25 हजार हेक्टरी मदतीची घोषणा कुणाची होती? सांगा उद्धवजी, असे म्हणत विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्ला चढवला.

भाजपने महाआघाडी सरकारविरोधात राज्यव्यापी एल्गार आंदोलन पुकारले आहे. राज्यभरात विविध ठिकाणी 400 आंदोलने झाली. मुंबईतील आझाद मैदानातील आंदोलनाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह सर्व भाजप दिग्गजांनी हजेरी लावली. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. सरकारला जागं करण्यासाठी हे आंदोलन आहे. सरकारविरोधात जो एल्गार पुकारला आहे, यात राज्यभर लाखो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. हे सरकार जनतेने निवडून दिलेले नाही, तडजोड करून सत्तेवर आलेले सरकार आहे.

- Advertisement -

उनको जो दौड में शामिल न थे, अशी अवस्था आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले. काळजीवाहू सरकार असताना आम्ही शेतकर्‍यांना मदत केली, राहिलेली रक्कम नवीन सरकारकडून मिळेल असं वाटलं होतं, पण वचनभंगाची सुरुवात झाली आहे. मराठवाड्यात पाणी पोहोचावे म्हणून टेंडर काढले. दुष्काळमुक्त करण्याचा जीआर काढला, पण या सरकारने स्थगिती दिली आहे. हे सरकार फक्त यात टेक्निकल प्रॉब्लेम आहे म्हणत आहे.

राज्यात महिला सुरक्षित नाहीत. गृहमंत्री एक तरी वक्तव्य केले का? औरंगाबाद मधील पीडितेला गृहमंत्री दोषी ठरवत असतील हे वाईट आहे. दिशा कायदा करणार तेव्हा करा पण आधी महिला भगिनींना सुरक्षा द्या, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुंबईत राहणार्‍या लोकांचा यांनी विश्वासघात केला. राहुल गांधी म्हणाले 500 स्के. फूट घर देऊ असे बोलले होते. काय झालं त्याचं बिल्डरांचे खिसे कसे भरतील याचा विचार सुरू आहे. जोपर्यंत शेवटच्या शेतकर्‍याला, महिला आया भगिनींना, झोपडपट्टी राहणार्‍या सामान्य माणसाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहिलं. आपला एल्गार सुरू राहिले, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

सावरकरांबाबत ठराव मांडणार का- चंद्रकांत पाटील
उद्या स्वातंत्र्यवीर सावरकरांची पुण्यतिथी आहे. बघूया महाराष्ट्र शासन सभागृहामध्ये सावरकरांबाबत ठराव मांडते का? ज्या सावरकरांवर यांची प्रचंड भक्ती आणि श्रद्धा आहे, बाळासाहेबांना तर स्वातंत्र्यवीर सावरकरांना कुणी काही म्हटलं तर चालायचं नाही. तर मग बाळासाहेबांचे वंशज सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांची आठवण काढून सभागृहात भाषण करतात का ते बघूया, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.

अब की बार बाप-बेटे की सरकार -मुनगंटीवार
अब की बार बाप-बेटे की सरकार, अब की बार स्थगिती सरकार, अशी टीका करताना महिला सुरक्षिततेच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारला धारेवर धरले. महिलांवर अत्याचार करणारे नराधम मोकाट कसे? असा सवाल भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला. उद्धव ठाकरे सरकार हे स्थगिती सरकार आहे. कितीशी चौकशी केली तरी, काही सापडणार नाही. मागील सरकारमध्ये शिवसेनाही सत्तेत होती, हेच ते विसरले आहेत,असेही मुनगंटीवार म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -