घरताज्या घडामोडी'वीर सावरकरांसंदर्भात गौरवउद्गार काढल्याने शिक्षा देणे दुर्दैवी!'

‘वीर सावरकरांसंदर्भात गौरवउद्गार काढल्याने शिक्षा देणे दुर्दैवी!’

Subscribe

'स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत गौरवउद्गार काढल्याबद्दल एखाद्या अधिकार्‍याला थेट सक्तीच्या रजेवर पाठविणे. हा प्रकार संपूर्ण महाराष्ट्राला काळीमा फासणारा आहे. यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष घालावे', अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

‘महाराष्ट्राचे आराध्य आणि संपूर्ण देशाला ज्यांच्या वीरतेचा सार्थ अभिमान आहे. त्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत गौरवउद्गार काढल्याबद्दल एखाद्या अधिकार्‍याला थेट सक्तीच्या रजेवर पाठविणे. हा प्रकार संपूर्ण महाराष्ट्राला काळीमा फासणारा आहे. त्यामुळे यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष घालावे आणि त्यांच्यावर केलेली कारवाई मागे घ्यावी’, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, ‘महात्मा गांधी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारख्या थोरपुरूषांची थोरवी कुणी सांगायचीच नाही का?, असा प्रश्न अशा घटनांमुळे उपस्थित होत आहे. मुंबई विद्यापीठातील अ‍ॅकडमी ऑफ थिएटर आर्टसचे संचालक योगेश सोमण यांना या अजब मानहानीला सामोरे जावे लागले आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल योगेश सोमण यांनी गौरवउद्गार काढल्यानंतर त्यांच्याविरूद्ध काँग्रेसप्रणित एनएसयुआय या संघटनेने आंदोलन केले आणि ते आंदोलन मागे घेण्यासाठी थेट योगेश सोमण यांनाच सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठ प्रशासनाने घेतला. हा निर्णय तमाम देशभक्तांना प्रचंड वेदना देणारा आहे. मध्यप्रदेशात सुद्धा एका प्राचार्यांना, अशीच शिक्षा भोगावी लागत आहे, हेही आपल्या कानावर आले असेलच. अशात महाराष्ट्रात आपल्यासारखे वीर सावरकरांच्या विचारांवर निष्ठा असणारे मुख्यमंत्री असताना किमान असा प्रकार होणे अपेक्षित नाही. एवढेच नाही तर काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना धमक्या सुद्धा दिल्या आहेत. हा अन्यायकारक प्रकार तत्काळ थांबवावा आणि तसे निर्देश आपण मुंबई विद्यापीठाला द्यावेत. कुठल्याही राजकीय दवाबावा बळी न पडता कृपया या प्रश्नात आपण लक्ष घालावे, ही विनंती’, असे देखील ते पुढे म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – आदित्य ठाकरेंना लग्नाविषयी विचारल्यास म्हणाले, दिशा…


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -