पुणे: दसऱ्यानिमित्त महालक्ष्मीचे सुवर्णवस्त्रातील रूप

महालक्ष्मीला १६ किलो वजनाची सोन्याची साडी दसऱ्यानिमित्त अर्पण

Pune

पुण्यातील सारसबागेसमोर असणाऱ्या महालक्ष्मी देवीला विशेष दसऱ्यानिमित्त सोन्याची साडी अर्पण करण्यात आली आहे. ही साडी संपुर्ण वर्षातून फक्त दोनवेळा नेसवण्यात येते. ही साडी शुद्ध सोन्यात बनवलेली असून १६ किलो वजनाची आहे. ही साडी दसरा तसेच लक्ष्मीपूजनाच्य़ा दिवशी महालक्ष्मीला परिधान करण्यात येते. आज देशभर विजयादशमी अर्थात दसरा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. तसेच पुण्यात देखील हे सुवर्णरूपातील सौंदर्य पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. कारण हे देवीचं हे सुवर्णवस्त्रातील हे रूप वर्षातून दोनदाच बघायला मिळत असल्याने भाविक आवर्जून जात असतात.

असे आहे हे सुवर्णवस्त्र

दक्षिण भारतातील कारागिरांनी ८ वर्षांपुर्वी ही सोन्याची साडी तयार केली होती. ही साडी तयार करण्यासाठी साधारण ६ महिन्याचा कालावधी लागला होता. आकर्षक नाजूक नक्षीकाम करून हे सुवर्णवस्त्र तयार करण्यात आले आहे. यंदाचे महालक्ष्मीला सोन्याची साडी नेसवण्याचे हे नववं वर्ष आहे.


हेही वाचा – कर्नाटकातील म्हैसूरमधील दसरा उत्सव सोहळा