घरमहाराष्ट्र'कमळाबाईचे काही खरं आहे का?'; मुंडेंचा शेलारांना सवाल

‘कमळाबाईचे काही खरं आहे का?’; मुंडेंचा शेलारांना सवाल

Subscribe

धनंजय मुंडे यांनी आशिष शेलारांना 'कसं काय शेलार बरं आहे का? कमळाबाईचं काही खरं हाय का?' असे प्रश्न विचारत भाजपवर टीका केली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही नेत्यांना पक्षात सामील करुन उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपवर जोरदार टीका केली जात आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी ट्विटरवर भाजप नेते आशिष शेलार यांना एका कवितेमार्फत प्रश्न विचारत भाजपवर टीका केली आहे. ‘कसं काय शेलार बरं आहे का? कमळाबाईचे काही खरे हाय का?’, असे प्रश्न धनंजय मुंडे यांनी विचारले आहेत.

भाजप आणि विरोधी पक्षांमध्ये ट्विटरवार

धनंजय मुंडे यांनी भाजपवर टीका करणारी कविता आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन शेअर केली आहे. या कवितेत त्यांनी आशिष शेलारांना प्रश्न विचारले आहेत. ‘आमच्या पक्षातील विझलेले दिवे घेऊन तुमच्या घरात उजेड पडणार आहे का?’, असा प्रश्नही धनंजय मुंडे यांनी कवितेमार्फत शेलारांना विचारला आहे.

- Advertisement -

काय आहे नेमकी कविता?

कसं काय शेलार बरं हाय का?
कमळाबाईचे काही खरं हाय का?

काल म्हणे तुमची हद्दच झाली
सत्तेसाठी आमची पक्षफोडी केली

- Advertisement -

वागणं तुमचं हाय रं गैर
आता तुमची नाय रं खैर

नेहमीच तुम्ही
खेळतात कावे
काय हाय उपयोग
घेऊन विझलेले दिवे?
तुमच्या घरात त्याचा
उजेड पडल काय?
कमळाबाईचे काही खरं हाय का?

ही पहिली वेळ नाही?

ट्विटरवर कवितेमार्फत टीका करणारी ही मुंडेंची पहिली वेळ नाही. याअगोदरही धनंजय मुंडेंनी आशिष शेलारांवर टीका केली होती. खरंतर आशिष शेलारांनी गेल्या आठवड्यात ‘चौकीदार के साईडइफेक्ट’ हा हॅशटॅग वापरुन ‘शिवाजी पार्कच्या बाभळीला बारामतीचे बोरं’, अशी राष्ट्रवादी आणि मनसेवर टीका केली होती. त्यानंतर धनंजय मुंडेंनी ‘काय त्या भाजप मुंबई अध्यक्षाची दैना, मंत्रिपद दिलं जाईना, शिवसेनेविरोधात राबराब राबवले, पुन्हा त्यांच्या मांडीला मांडी लावून बसवले, प्रत्येक बाबतीत मुख्यमंत्र्यांनी यांना फसवले, आता यांना यांच्यातलेच कवी आठवले’, अशा शब्दात आशिष शेलारांवर टीका केली होती. त्यानंतर आता पुन्हा मुंडेंनी शेलारांना टोला लगावला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -