घरमहाराष्ट्रचड्डी उतरवण्याची भाषा करणाऱ्यांनी चड्डीत राहावं - धनंजय मुंडे

चड्डी उतरवण्याची भाषा करणाऱ्यांनी चड्डीत राहावं – धनंजय मुंडे

Subscribe

शरद पवारांनी सुरु केलेला चड्ड्यांचा विषय अद्याप थांबायचं नाव घेत नसून आधीर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आता धनंजय मुंडे यांनी त्यावर टिप्पणी केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात चड्डीवर बरीच चर्चा रंगताना दिसत आहे. सर्वात आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपला टीका करताना संघाचा गणवेश असलेल्या हाफ पँटवर खोचक टिप्पणी केली. त्यानंतर स्वत: मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिलं. आता त्यावर विधान परिषदेतली विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्र्यांना चड्डीवरूनच टोमणा मारला आहे. ‘२३ तारखेला चड्डी उतरवण्याची भाषा करणाऱ्यांनी स्वत:च्या चड्डीत राहावं. नाहीतर निकालाआधीच तुमची चड्डी गळून पडेल’, असा खोचक सल्ला धनंजय मुंडेंनी दिला आहे. मावळमध्ये पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेत धनंजय मुंडे बोलत होते.

हे हाफ पँट, फुल पँट काय प्रकरण आहे?

काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी माढ्यामध्ये प्रचार सभेत बोलताना मोहिते पाटलांवर टीका केली होती. ‘तुम्ही तिकडे गेलात. आता फक्त हाफ पँट घालून तिथे जाऊ नका. एवढं करा. तुमचे पाय आणि मांड्या बघण्याची वेळ आमच्यावर आणू नका’, असं शरद पवार म्हणाले होते. त्याला प्रत्युत्तर खुद्द मुख्यमंत्र्यांनीच दिलं होतं. ‘पवारसाहेब आता म्हणतायत की चड्ड्या घालून तिकडे जाऊ नका, तुमचे पाय-मांड्या बघण्याची वेळ आमच्यावर आणू नका. पण आता चड्ड्या घालत नाहीत, तर फुल पँट घालतात. आणि याच चड्डीवाल्यांच्या पाठिंब्यावर पहिल्यांदा मुख्यमंत्री झाला होतात हे विसरलात का? २३ मेला कुणाची चड्डी उतरते ते कळेलच‘, असं मुख्यमंत्री बारामतीमध्येच बोलताना म्हणाले होते. त्यावर आज पुन्हा राष्ट्रवादीकडून टीका झाली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ‘उरलेली चड्डी पण काढून घेण्यात येईल’

उद्धव ठाकरेंकडे इतकी संपत्ती कुठून आली?

मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर टीका करताना मुंडे म्हणाले, ‘सध्या मोदींसोबतच राज्याच्या मुख्यमंत्र्यांची वाचाळताही वाढत चालली आहे. अहो, हाफ चड्डीची फुल पँट झाली, म्हणजे माणसाला अक्कल येते असं नाही! २३ तारखेला चड्डी उतरवण्याची भाषा करणाऱ्यांनी स्वत:च्या चड्डीत राहावं. नाहीतर निवडणुकांच्या आधी तुमचीच चड्डी गळून पडल्याशिवाय राहणार नाही’, असं धनंजय मुंडे यावेळी म्हणाले. यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंवरही जोरदार टीका केली. ‘तुम्ही ग्रामपंचायतीचे-जिल्हापरिषदेचे सदस्य नाहीत. आमदार-खासदार-मंत्री काहीच नाही. मग तुमच्याकडे इतकी संपत्ती कुठून आली?’ असा सवाल त्यांनी उद्धव ठाकरेंना केला. ‘इडीची पिडा टाळण्यासाठीच तुम्ही औरंगजेबाला मुजरा केला. इतकंच नाही तर जय गुजरातही म्हणून आले’, अशी टीका धनंजय मुंडेंनी यावेळी केली.


तुम्ही हे वाचलंत का? – ‘मी आमदार असताना मुख्यमंत्री हाफ चड्डीत फिरत होते’
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -