घरमहाराष्ट्रधनंजय मुंडेंच्या PRO चं व्हॉट्सअॅप बंद

धनंजय मुंडेंच्या PRO चं व्हॉट्सअॅप बंद

Subscribe

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांचे जनसंपर्क अधिकारी प्रशांत जोशी यांचे अचानक व्हॉट्सअॅप बंद करण्यात आले होते.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांचे जनसंपर्क अधिकारी प्रशांत जोशी यांचे अचानक व्हॉट्सअॅप बंद झाले आहे.भाजप सरकारने डिजीटल आणीबाणी लागू केल्याचा आरोप मुंडे यांनी सरकारवर केला. विशेष म्हणजे, ‘आपला फोन नंबर व्हॉट्सअॅपसाठी बॅन करण्यात आल्याचा मेसेज’ व्हॉट्सअॅपकडून त्यांना येत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. व्हॉट्सअॅप बंद केले होते. मात्र दोन दिवसांनंतर ते आज सकाळी पुन्हा सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे जाणूनबुजून हे व्हॉट्सअॅप अकाऊंट बंद केले गेले की, कुणीतरी जोशी यांचा नंबर स्पॅम म्हणून रिपोर्ट केला होता, त्यामुळे व्हॉट्सअॅपने हा नंबर डिअॅक्टिव्हेट केला, हे अजुनही कळलेले नाही.

‘निर्धार परिवर्तनाचा’ यात्रा

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांचे जनसंपर्क अधिकारी प्रशांत जोशी हे गेल्या १३ वर्षांपासून मुंडे यांचे स्वीय सहायक म्हणून काम पाहतात. सध्या ते धनंजय मुंडेंसोबत राष्ट्रवादीच्या ‘निर्धार परिवर्तनाचा’ या यात्रेचे मीडिया मॅनेजमेंटचे काम करत आहेत. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची ‘निर्धार परिवर्तान’ यात्रा सुरु असून त्यानिमित्त महाराष्ट्र दौरा करण्यात येत आहे. या यात्रेमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांचा आणि विधान परिषद विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या सभांचा धडाका सुरु आहे. या संभांमधून ते राज्य सरकार आणि मोदी सरकारवर जोरदार टीका करत आहेत. मुंडेच्या या सभांचे वार्तांकन सोशल मीडियातून तात्काळ जनतेपर्यंत पोहोचविण्याचं काम त्यांचे जनसंपर्क अधिकारी प्रशांत जोशी करतात. तसेच परळीपासून ते मुंबईपर्यंतच्या वेगवेगळ्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये या संभाचे वार्तांकन काही मिनिटांतच लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम ते करतात. मात्र अचानक त्यांचा व्हॉट्सअॅप नंबर बॅन करण्यात आले होते.

- Advertisement -

व्हॉट्सअॅप नंबर बॅन

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांचे जनसंपर्क अधिकारी प्रशांत जोशी यांचे व्हॉट्सअॅप नंबर बॅन केल्याचा दावा स्वत: धनंजय मुंडे यांनी केला आहे. विरोधी पक्षनेत्याच्या PRO च्या फोनवर नजर ठेवणं, त्यांच्या नंबर बॅन करणं, त्यांच्या फोनवर बंदी आणणं म्हणजे देशात आणीबाणी लागू करण्यासारखंच आहे.

Dhananjay munde's PRO whatsapp is close
धनंजय मुंडेंच्या PRO चं व्हॉट्सअॅप बंद

व्हॉट्सअॅप झाले सुरु

प्रशांत जोशी यांचे व्हॉट्सअॅप बंद केले होते. मात्र त्यांनी संपर्कासाठी दुसरा क्रमांक घेतला होता. त्यांनी व्हॉट्सअॅपशीही यासंदर्भात संपर्क केला होता. तसेच तोच नंबर पुन्हा सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते आणि त्यांचा आता व्हॉट्सअॅप नंबर सुरु झाला असल्याचे प्रशांत जोशी यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

वाचा – शिवस्मारकासंबधी सरकार गंभीर नाही – धनंजय मुंडे

वाचा – अजित पवार आणि धनंजय मुंडेचा फिटनेस; ६ किमी नाईट वॉक


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -