घरमहाराष्ट्रमुख्यमंत्र्यांपेक्षा मुंडेचे भाषण अधिक लोकप्रिय

मुख्यमंत्र्यांपेक्षा मुंडेचे भाषण अधिक लोकप्रिय

Subscribe

धुळ्यात महानगर पालिका निवडणूक प्रचार शिगेला पोहचली असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री यांनी एकाच दिवशी भाषण केले होते. या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा धनंजय मुंडे यांनी भाषण अधिक लोकांनी बघितली असून मुख्यमंत्र्यांपेक्षा मुंडेचे भाषण अधिक लोकप्रिय असल्याचे दिसून येत आहे.

धुळ्यात सध्या महानगर पालिकेच्या निवडणुकीचे धुमशान सुरु आहे. पण, या निवडणुकीनिमित्त एक वेगळी लढाई समोर आली आहे ती म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे या दोघांत ऑनलाईन बाबतीत सरस कोण? सध्यातरी यात धनंजय मुंडे यांनी बाजी मारली आहे. डिजीटल प्रचारात धनंजय मुंडे देवेंद्र फडणवीसांपेक्षा २४ पट पुढे आहेत. तसेच फेसबुक लाईव्हवर फडणवीस यांच्या पेक्षा धनंजय मुंडेंची भाषण अधिक लोकप्रिय असल्याचे समोर आले आहे.

धनंजय मुंडे देवेंद्र फडणवीसांपेक्षा २४ पट पुढे

६ डिसेंबर रोजी धुळ्यात महानगर पालिका निवडणूक प्रचार शिगेला पोहचली असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक म्हणून धनंजय मुंडे यांनी जोरदार सभा घेतली होती. नेमके त्याचवेळेस भाजपचे स्टार देवेंद्र फडणवीस सुद्धा धुळ्यातच सभा घेत होते. दोघांच्याही सभेला जोरदार प्रतिसाद मिळाला होता. मात्र त्यादरम्यान दोघांच्याही सभा त्यांच्या सोशल मिडिया टीमने फेसबुकवर लाईव्ह केल्या. ही सभा होऊन १५ तास झाले. त्यानंतर नागरिकांनी कोणता व्हिडीओ सर्वात जास्त पाहिला हे बघण्यात आले. सर्वात जास्त धनंजय मुंडे यांच्या सभेचा व्हिडीओ सर्वाधिक पाहण्यात आल्याचे उघड झाले. धनंजय मुंडे यांच्या सभेचा व्हिडीओ जवळपास ४८ हजार लोकांनी बघितला आहे तर देवेंद्र फडणवीस यांनी जेमतेम ४२ हजारांचा आकडा गाठला आला आहे.

- Advertisement -

वाचा – मराठा आरक्षणासाठी भांडतो म्हणून पोटात दुखतं का? – धनंजय मुंडे


११ टक्के लोकांनी मुंडेंचे भाषण पाहिले

सोशल मिडियाच्या बाबतीत धनंजय मुंडे सध्यातरी सर्वात पुढे असल्याचे समोर आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एकूण अनुसारकांपैकी (फॉलोवर्स) केवळ ०.४५ टक्के लोकांनी मुख्यमंत्र्यांचे यांचे भाषण बघितले आहे. तर धनंजय मुंडेंचे भाषण तब्बल ११ टक्के लोंकांनी पाहिले आहे. याचाच अर्थ धनंजय मुंडे देवेंद्र फडणवीसांपेक्षा २४ पटींनी पुढे असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तुर्तास तरी डिजीटल प्रचारात धनंजय मुंडेंनी देवेंद्र फडणवीसांना धोबीपछाड दिला आहे. आज पुन्हा दोघेही अहमदनगरमध्ये एकाच वेळी आमनेसामने येणार आहेत तेव्हा या दोन नेत्यांत कोणकोणाला भारी पडणार याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

- Advertisement -

वाचा – राम शिंदे यांचे वक्तव्य हीच सरकारची खरी मानसिकता – मुंडे


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -