घरमहाराष्ट्रनाशिकघरवापसी; राष्ट्रवादीचे नेते धनराज महाले पुन्हा शिवसेनेत

घरवापसी; राष्ट्रवादीचे नेते धनराज महाले पुन्हा शिवसेनेत

Subscribe

लोकसभा निवडणूकीत शिवबंधनतोडून राष्ट्रवादीत दाखल झालेले दिंडोरीचे माजी आमदार धनराज महाले यांनी पुन्हा शिवधनुष्य हाती घेतले आहे.

लोकसभा निवडणुकीत शिवबंधनतोडून राष्ट्रवादीत दाखल झालेले दिंडोरीचे माजी आमदार धनराज महाले यांनी पुन्हा शिवधनुष्य हाती घेतले आहे. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, संपर्क नेते खासदार संजय राऊत, जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा मातोश्रीवर पार पडला.

धनराज महाले यांनी राष्ट्रवादीतर्फे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात लोकसभेची उमेदवारी केली होती. त्यामुळे राष्ट्रवादीच्या तत्कालीन इच्छूक उमेदवार डॉ. भारती पवार यांच्या उमेदवारीचा पत्ता कट झाला. याचा योग्यवेळी फायदा उठवत भाजपने डॉ. भारती पवार यांना उमेदवारी देवून तब्बल तीन लाखांहून अधिक मताधिक्क्याने निवडून आणले. महालेंना पराभवाचा सामना करवा लागला. तसेच, जिल्हा परिषदेचे गटनेतेपद सोडावे लागले होते. आता विधानसभा निवडणुकीत दिंडोरी विधानसभेची जागा शिवसेनेकडे असल्यामुळे त्यांनी पुन्हा शिवबंधन बांधल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपने युती केली होती. दिंडोरीत भाजपचा खासदार असल्यामुळे ही जागा त्यांच्याच वाट्याला जाणार होती. त्यामुळे महाले यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादीचे घड्याळ हाती घेतले होते. मात्र राष्ट्रवादीतून डॉ. भारती पवार यांचे तिकीट कापल्यामुळे त्या नाराज होऊन भाजपमध्ये गेल्या आणि निवडूनही आल्या. आता दिंडोरी विधानसभेत राष्ट्रवादीचे नरहरी झिरवळ हे विद्यमान आमदार असल्यामुळे महालेंना विधानसभेचेही दरवाजे बंद आहेत. त्यामुळेच त्यांनी पुन्हा एकदा शिवसेनेची वाट धरली असल्याचे बोलले जात आहे.

धनराज महाले यांचा परिचय

धनराज महाले हे जनता दलाचे माजी खासदार हरिभाऊ महाले यांचे सुपुत्र आहेत. महाले शिवसेना पक्षातून दिंडोरी विधानसभेचे माजी आमदार होते. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नरहरी झिरवळ यांनी महालेंचा पराभव केला होता. २०१९ च्या जानेवारीमध्ये महाले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -