धुळे-नंदुरबार विधान परिषदेची पोटनिवडणूक १ डिसेंबरला

धुळे-नंदुरबार विधान परिषद (स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघ) निवडणूक होणार आहे. काँग्रेसचे अमरीश पटेल यांनी राजीनामा दिल्याने जागा रिक्त झाली होती. त्या जागेवर १ एप्रिलला निवडणूक होणार होती. मात्र, कोरोनामुळे ही निवडणूक स्थगित करण्यात आली. अखेर निवडणुकीची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

१ डिसेंबरला धुळे-नंदुरबार विधान परिषदेची पोटनिवडणूक होणार आहे. एका जागेसाठी २ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. अमरीश पटेल यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केला. आता भाजपकडून अमरीश पटेल ही निवडणूक लढवणार आहेत. तर काँग्रेसकडून अभिजीत पाटील रिंगणात आहेत. १ डिसेंबरला मतदान होणार आहे तर ३ डिसेंबर रोजी होणार मतमोजणी होणार आहे.