घरमहाराष्ट्रसोलापुरात काँग्रेसची अवघड परीक्षा

सोलापुरात काँग्रेसची अवघड परीक्षा

Subscribe

सोलापूर जिल्हा म्हटले की, सुशीलकुमार शिंदे, असे एकेकाळचे समीकरण होेते. सुशीलकुमार शिंदे यांनी जिल्ह्याला काँग्रेसचा बालेकिल्ला बनवला. मात्र राजकारण कायम एकाच अवस्थेत राहत नाही, स्थित्यंतरे येत असतात. तसेच सोलापूर जिल्ह्यात झाले. २०१४ मध्ये मोदी लाटेत सुशीलकुमार शिंदे यांचा लोकसभेत पराभव झाला आणि जिल्ह्यावरील काँग्रेसची पकड ढिली झाली. या लोकसभा मतदार संघात ६ पैकी ३ मतदार संघांमध्ये काँग्रेसचे आमदार आहेत. तर भाजपचे २ आणि राष्ट्रवादीचा १ आमदार आहे. त्यामुळे काँग्रेसचे या जिल्ह्यावर वर्चस्व आहे. मात्र सोलापुरातही काँग्रेसला गळती लागल्याने जिल्ह्यात काँग्रेसला यंदाची परीक्षा अवघड बनणार आहे.

सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर मतदारसंघाने फक्त राज्यातच नव्हे तर देशातही नेतृत्व दिले आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे दक्षिण सोलापूर मतदारसंघाचे आमदार असतानाच मुख्यमंत्री झाले होते. वि.गु. शिवदारे, आनंदराव देवकते, गुरुनाथ पाटील, रतिकांत पाटील अशा दिग्गजांनी या मतदार संघाचे नेतृत्व केले आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या विजयाने भाजपची प्रचंड मोठी फळी आता या मतदारसंघात निर्माण झाली आहे. 2009 साली काँग्रेसने माजी मंत्री आनंदराव देवकते यांचा पत्ता कट करुन शहरी भागातील दिलीप माने यांना उमेदवारी दिली. इकडे शिवसेनेने तत्कालीन आमदार रतिकांत पाटील यांना पुन्हा एकदा मैदानात उतरवले. मात्र तत्कालीन आमदाराचा पराभव करत दिलीप माने यांनी आमदारकी मिळवली. मात्र 2014 मध्ये पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार्‍या दिलीप माने यांचा पराभव करून सुभाष देशमुख यांचा विजय झाला. सुभाष देशमुख यांच्या विजयाने जिल्ह्याला मंत्रीपदही मिळाले. भाजपकडून पुन्हा एकदा सहकारमंत्री सुभाष देशमुख यानांच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. सुभाष देशमुखांशिवाय सध्यातरी भाजपकडे दुसरा चेहरा या मतदारसंघात नाही. मात्र जर महायुती झाली नाही तर भाजप विरोधात सेनेचा उमेदवार उभा ठाकण्याची शक्यता आहे. मागील निवडणुकीत पराभव झालेले शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष गणेश वानकर हे शिवसेनेकडून या मतदारसंघात उमेदवारीसाठी इच्छूक आहेत.

- Advertisement -

2019 च्या लोकसभेपासून सोलापूर जिल्ह्यात वचिंत बहुजन आघाडीचा शिरकाव झाला आहे. त्यात दक्षिण सोलापूरच्या भूमीपुत्राचा दबलेला आवाजही आता जोर धरु लागला आहे. प्रस्थापित नेत्यांना पर्याय देण्यासाठी भूमिपुत्रांनी सर्वधर्मीय व सर्वपक्षीय तिसर्‍या आघाडीची मोट बांधण्याचे ठरविले आहे. तर वंचितदेखील उमेदवारीसाठी चाचपणी करत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -