घरमहाराष्ट्रराष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहिरनामा समिती अध्यक्षपदी दिलीप वळसे-पाटील

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहिरनामा समिती अध्यक्षपदी दिलीप वळसे-पाटील

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसने आज लोकसभेसाठी जाहिरनामा समितीची घोषणा केली. या समितीमध्ये २२ सदस्यांची निवड करण्यात आली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जाहिरनामा समिती स्थापन केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांची निवड करण्यात आली आहे. या समितीमध्ये २२ सदस्यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी दिली आहे.

जाहीरनामा समितीतील सदस्य

राष्ट्रवादी काँग्रेसने आज लोकसभेसाठी जाहिरनामा समितीची घोषणा केली. या समितीमध्ये सदस्य म्हणून आमदार भास्करराव जाधव, ज्येष्ठ नेते अण्णा डांगे, खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार शशिकांत शिंदे, मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, आमदार राजेश टोपे, अनिल देशमुख, राजेंद्र शिंगणे, खासदार वंदना चव्हाण, आमदार विदया चव्हाण, माजी आमदार जयदेव गायकवाड, युवकचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोतेपाटील, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, अल्पसंख्यांक सेलचे प्रदेशाध्यक्ष गफार मलिक,डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे, विदयार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, युवती प्रदेशाध्यक्षा कुमारी सक्षणा सलगर, प्रदेश प्रवक्ते भूषण राऊत यांचा समावेश आहे.

- Advertisement -

भाजपच्या जाहीरनामा समितीत नारायण राणे

दरम्यान, भाजपच्या देखील जाहीरनामा समितीची देखील नुकताच घोषणा झाली. भाजपच्या या जाहीरनामा समितीत नाराणय राणे यांची वर्णी लागली आहे. २०१४ नंतर काँग्रेसमध्ये असताना राणे यांनी भाजपच्या धोरणांवर टीका केली होती. आता त्या धोरणांबाबत जाहीरनामा समितीमध्ये ते काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -