घरCORONA UPDATEनागरिकांचे स्थलांतर थांबवा, राज्यपालांनी दिले आयुक्तांना निर्देश

नागरिकांचे स्थलांतर थांबवा, राज्यपालांनी दिले आयुक्तांना निर्देश

Subscribe

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज राज्यातील सर्व सहा विभागीय आयुक्तांशी दूरध्वनीवरून चर्चा केली. प्रत्येक विभागातील करोना व्हायरस संक्रमण तसेच लोकांचे स्थलांतर याबाबत त्यांनी माहिती घेतली.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज राज्यातील सर्व सहा विभागीय आयुक्तांशी दूरध्वनीवरून चर्चा केली. प्रत्येक विभागातील करोना व्हायरस संक्रमण तसेच लोकांचे स्थलांतर याबाबत त्यांनी माहिती घेतली. करोना संक्रमण थांबवण्यासाठी प्रयत्न करण्यासोबतच राज्यातून इतरत्र स्थलांतर करत असलेल्या लोकांना ते जेथे असतील तेथे थांबवण्यासाठी पावले उचलण्याचे निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना द्यावे, अशी सूचना राज्यपालांनी विभागीय आयुक्तांना यावेळी केली.

सर्व मोठ्या शहरांमध्ये तसेच औद्योगिक वसाहतींमध्ये सार्वजनिक उद्घोषणा करून स्थलांतर करत असलेल्या लोकांना थांबण्याचा आग्रह करावा. तसेच त्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था करण्यासाठी शासन व अशासकीय संस्था करत असलेल्या प्रयत्नांबाबत त्यांना अवगत करावे, असेही राज्यपालांनी यावेळी सांगितले.  ज्या जिल्ह्यांमध्ये इतर राज्यांमधून किंवा इतर जिल्ह्यांमधून लोकं प्रवेश करत आहेत. त्यांनादेखील थांबवून घेऊन त्यांची निवास व भोजनाची व्यवस्था करण्याचे राज्यपालांनी निर्देश दिले. राज्यपालांनी नागपूर, अमरावती, नाशिक, औरंगाबाद, कोकणव पुणे येथील विभागीय आयुक्तांशी चर्चा केली.

- Advertisement -

हेही वाचा – भारतात करोनाग्रस्तांची संख्या ८३४, तर १९ जणांचा मृत्यू

राज्यातील करोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ 

देशात करोनापासून मुक्तता मिळवण्यसाठी लॉकडउन जाहीर केले आहे. तर दुसरीकडे करोग्रस्त रूग्णांच्या संख्येतही वाढ होताना दिसत आहे. आज महाराष्ट्रात करोनाचे सहा रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात करोनाचा आकडा १७७ वर गेला आहे. त्यामुळे महाराष्ट्राची चिंता वाढली आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात करोनाची संख्या १५९ वर होती. मात्र, आता ही संख्या वाढली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. मुंबईत आज सकाळी पाच तर नागपूरमध्ये एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या १५९ वरुन १७७ वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच देशात लॉकडाउन करण्यात आले आहे. मात्र, असे असताना देखील करोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने राज्याची चिंता वाढली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -