भाजपमध्ये बोंबाबोंब : अनिल गोटे आणि भामरे यांच्यातील वाद शिगेला

धुळ्याचे भाजप आमदार अनिल गोटे आणि केंद्रिय राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्यातील वाद उफाळून येताना दिसत आहे. दोघांनी पत्रकार परिषद घेऊन एकमेकांवर टीका केली.

Dhule
Dispute between Anil Gote and Subhash Bhamre
भाजपमध्ये बोंबाबोंब : अनिल गोटे आणि भामरे यांच्यातील वाद शिगेला

धुळ्यात काही दिवसांपासून भाजपच्याच नेत्यांमध्ये वाद-प्रतिवाद सुरु आहेत. सध्या त्यांचा हाच वाद शिगेला पोहोचलेला दिसत आहे. धुळ्याचे भाजप नेते अनिल गोटे या वादामध्ये एकटे पडताना दिसत आहेत. गेल्या आठवड्यात धुळ्यात भाजपच्या एका कार्यक्रमात स्टेजवरच दोन गटांमध्ये हाणामारी झाली होती. त्यांनंतर गोटे यांनी सोशल मीडियावर एक पत्र टाकले होते. या पत्रामध्ये त्यांनी भाजपच्या नेतेमंडळींवर जोरदार टीका केली होती. त्यात धुळ्याचे केंद्रीय राज्यमंत्री सुभाष भामरे यांचे देखील नाव होते. आता या दोघांमधील वाद उफाळून येताना दिसत आहे. दोघांनी पत्रकार परिषद घेऊन एकमेकांवर टीकास्त्र सोडले आहे.

हेही वाचा – भाजपचे आमदार अनिल गोटे यांचा भाजपच्याच सभेत राडा!

काय म्हणाले भामरे?

सुभाष भामरे यांनी गोटेंवर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणतात की, भाजपमध्ये सध्या गुंडांना अधिक महत्त्व आहे. धुळे शहराचा विकास व्हायला हवा. त्यासाठी मी सगळ्यांना सत्ता दिली आहे. परंतु, काही लोकांनी शहराची वाट लावली आहे, असे भामरे म्हणाले. त्याचबरोबर भामरे सांगतात की, आपण तीन मित्रांच्या संगतीने कॅन्सर सेंटर काढतोय. त्यासाठी एचडीएफसीकडून १७ कोटींचे कर्जही काढले असल्याचे ते म्हणाले. त्याचबरोबर माझा मुलगा आताच विदेशातून शिक्षण घेऊन आला. तो राजकारणातही नाही. मी केंद्रिय नगरसेवक आहे. आणि आता नगरसेवकासाठी माझ्या मुलाच्या मागे लागत आहेत, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – १९ नोव्हेंबर अनिल गोटे आमदारकीचा राजीनामा देणार

गोटेंनी दिले प्रत्युत्तर

भामरेंच्या या पत्रकार परिषदेला गोटे यांनी उत्तर दिले आहे. त्यांनीही पत्रकार परिषद बोलवून सांगितले की, गुंडगिरीमुक्त शहर आम्हालाही हवे आहे. शिवाय, गुंडांच्या शुद्धीकरणाला माझा विरोध आहे. गोटेंनी आपल्यावर झालेल्या सर्व आरोपांना फेटाळले आहे. आपल्यावर झालेले सर्व आरोप हे बिनबुडाचे असल्याचे ते म्हटले आहेत.


हेही वाचा – जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केली भाजप नेता आणि भावाची हत्या