घरमहाराष्ट्रचालक-वाहकांचा जीव 'अंडरवेअर बनियान'मध्ये अडकलेला...

चालक-वाहकांचा जीव ‘अंडरवेअर बनियान’मध्ये अडकलेला…

Subscribe

'डेपोतील कामगार आपल्या झोपायची व्यवस्था आणि अंडरवेअर बनियान धुतल्यानंतर कॉट जवळ ते वाळत घालण्यासाठी रॉड आहे का?' याच विचारत असतो', असं वक्तव्य परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केलं.

‘चालक-वाहकांचा जीव हा झोपायची व्यवस्था आणि अंडरवेअर बनियान धुतल्यानंतर ते कॉटजवळ वाळत घालण्यासाठी रॉड असला पाहिजे, याच गोष्टींमध्ये अडकलेला असतो’, असं वक्तव्य परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केलं आहे. आज आज पिंपरी-चिंचवड येथील वल्लभ नगर बस स्थानकातील विश्रांतीगृहाचे नूतनीकरण करण्यात आले. याप्रसंगी रावते बोलत होते. चालक आणि वाहक यांच्यासाठी नव्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्याचं सांगत रावते म्हणाले की, ‘डेपोतील कामगार आपल्या झोपायची व्यवस्था आणि अंडरवेअर बनियान धुतल्यानंतर कॉट जवळ ते वाळत घालण्यासाठी रॉड आहे का?’ याच विचारत असतो.’ याशिवाय विश्राम गृहाच्या नूतनीकरणाच्या कामाविषयी बोलताना रावते म्हणाले, की ‘झोपण्याचे बेड पत्र्याचे असले तरी पत्र्याच्या बेडच्या जवळ मोबाईल चार्जर पॉईंट असला पाहिजे. आजकाल त्याशिवाय कोणाचं भागत नाही. मोबाईल हेच आज सगळं काही झालं आहे.’

वाचा: आता भारतात बनणार iPhone, किंमत आणखीन कमी

कार्यक्रमादरम्यान बोलताना रावते म्हणाले, की ‘मी रात्रंदिवस ग्रामीण भागात फिरणारा माणूस आहे. आता जरी मी गाडीतून फिरत असलो तरी, पूर्वी मी बसनेच फिरायचो. पक्षाचं कामदेखील मी बसमध्ये फिरूनच करत होतो. गेली ३०-३२ वर्षं मी ग्रामीण भागात काम करत आहे. त्यामुळे मी मुंबईचा महापौर होतो हेदेखील लोकं विसरली आहेत. त्यामुळे बस चालक आणि वाहकांविषयी मला तितकीच आस्था आहे. त्यामुळे नूतनीकरणादरम्यान त्यांना आवश्यक सर्व सोयी-सुविधांचा विचार करुनच बस आगाराच्या नव्या आराखड्याचा नकाशा तयार करण्यात आला आहे.’ मात्र, ‘अंडर-बनियन वाळत घालण्याच्या मुद्द्यावरुन’ रावते यांनी बस वाहक आणि चालकांची घेतलेली फिरकी कार्यक्रमात एकच हशा पिटला होता.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -