घरमहाराष्ट्रक्रांतीकारक हुतात्मा राजगुरुंच्या वाड्यावर दिपोत्सव

क्रांतीकारक हुतात्मा राजगुरुंच्या वाड्यावर दिपोत्सव

Subscribe

दिपावलीनिमित्त क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांच्या जन्म वाड्यावर राजगुरुनगर शहरातील तरुणांनी एकत्र येऊन राजगुरुवाडा दिपोमय केला.

दिपावलीनिमित्त आपल्या घरापासून ते शहरापर्यंत प्रत्येक ठिकाणी विविध रंगांच्या प्रकाशात, पणत्या लावून दिपोत्सव साजरा केला जातो. त्याच उत्साहात दिपावलीनिमित्त क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांच्या जन्म वाड्यावर राजगुरुनगर शहरातील तरुणांनी एकत्र येऊन जाणीव ग्रुप, आम्ही राजगुरुनगरकर यांच्या माध्यमातून हुतात्मा राजगुरुवाडा दिपोमय केला. आपल्या गावातील एक तरुण देशाच्या स्वातंत्र्यासाठी मोठा लढा देऊन हसत हसत फासावर गेले. त्याच हुतात्म्याच्या जन्मभूमीत दिपावलीच्यानिमित्त पाडव्याच्या मुहूर्तावर संपूर्ण राजगुरु वाडा पणत्या लावून लखलखीत करण्यात आला होता. देशाच्या नकाशाची तिरंग्यात रांगोळी कडून दिव्यांनी सजवण्यात आली होती.

राजगुरु यांचा जन्मवाडा दिव्यांनी उजळला

गेल्या आठ दिवसांपासून सोशल मीडियावर जाणीव ग्रुपच्या माध्यमातून राजगुरु वाड्यावर होणाऱ्या दिपोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देत गावागावातील तसेच राजगुरुनगर शहरातील तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दिपोत्सवात “आम्ही राजगुरुनगरकर” हा ग्रुपही सहभागी झाला होता. क्रांतीकारक हुतात्मा राजगुरुंच्या जन्म वाड्याच्या प्रवेश द्वारापासून ते जन्मखोली आणि समोरील गार्डन ध्वजस्तंभ या सर्व परिसरात दिवे लावण्यात आले होते.

- Advertisement -

क्रांतीकारकाच्या शौर्याचे कौतुक

पवित्र अशा भीमानदीच्या तिरावर असणाऱ्या या क्रांतीकारकाच्या वाड्याचे दिपोत्सवामुळे रुप पालटले. डोळे दिपवून टाकणार हा दिपोत्सव पहाण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, आपल्या क्रांतीकारकाच्या शौर्याचे कौतुक राजगुरुकरांमध्ये दिवसेंदिवस वाढत असताना तरुणाईंचा मोठा सहभाग नोंदविला जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -