घरमहाराष्ट्रगरजू रुग्णांचे आयसीयू बेड विनाकारण अडवून ठेवू नका

गरजू रुग्णांचे आयसीयू बेड विनाकारण अडवून ठेवू नका

Subscribe

नवी मुंबईतील कोविड सेंटरचे लोकार्पण

कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर सर्वच रुग्णांना ऑक्सिजन आणि आयसीयूची गरज नसते. मात्र, अनेकजण ओळखी पाळखीचा उपयोग करून गरज नसतानाही आयसीयू बेड अडकवून ठेवतात. हे बेड गरजू रुग्णांसाठी आहेत, ते विनाकारण अडवून ठेवू नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केली आहे. नवी मुंबई महापालिका प्रशासनाने उभारलेल्या अत्याधुनिक कोविड सेंटरचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या ऑनलाईन उपस्थितीमध्ये शुक्रवारी पार पडले.
ऑक्सिजन बेडसाठी कोरोना रुग्णांची होत असलेली परवड थांबवण्यासाठी नवी मुंबई महापालिका प्रशासनाने तुर्भे येथील राधास्वामी सत्संग आश्रमात आणि सानपाडा येथील एमजीएम रुग्णालयामध्ये 1003 ऑक्सिजन बेडची अतिरिक्त व्यवस्था केली आहे. या अत्याधुनिक कोविड सेंटर अन्य सहा सुविधांचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केले.

यावेळी ते म्हणाले की कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी प्रत्येकाने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या भावनेतून काम करणे आवश्यक आहे. आपल्यामुळे आपले कुटुंब अडचणीत येणार नाही, याची दक्षता प्रत्येकाने घेण्याची गरज आहे. कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर अनेक जण घाबरून जातात आणि गरज नसताना ओळखीने आयसीयू किंवा ऑक्सिजनचे बेड उपलब्ध करून घेतात. त्यामुळे ज्यांना आवश्यकता आहे अशा रुग्णांना ऑक्सिजनचे बेड उपलब्ध होत नाहीत. यावरही महापालिका प्रशासनाने नियंत्रण ठेवावे अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

- Advertisement -

याप्रसंगी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, आमदार शशिकांत शिंदे, माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले, जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशोक गावडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक, महापालिका आयुक्त अभिजित बांगर, अतिरिक्त महापालिका आयुक्त सुजाता ढोले, संजय काकडे, शहर अभियंता सुरेंद्र पाटील आदी उपस्थित होते.

नवी मुंबई महापालिकेच्या उपक्रमांचे कौतुक
ऑक्सिजनअभावी रुग्णाचा मृत्यू होऊ नये, यासाठी नवी मुंबई महापालिका प्रशासनाने शौचालयांमध्ये ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. कोरोना झाल्यानंतर रुग्ण एकाकी पडतो. मात्र त्याचा हा एकाकीपणा घालवण्यासाठी महापालिका प्रशासनाने व्हिडीओ कॉलिंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. महापालिकेचे हे दोन्ही उपक्रम कौतुकास्पद आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

- Advertisement -

राजकारण करण्याची ही वेळ नाही
कोरोनाच्या थैमानामुळे संपूर्ण जग हतबल झाले आहे. या कठीण प्रसंगांमध्ये सत्ताधारी आणि विरोधक यांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे. मात्र, विरोधक या आणीबाणीच्या प्रसंगात राजकारण करतात, हे फार मोठे दुर्दैव आहे, अशी प्रतिक्रिया नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -