घरमहाराष्ट्रभावी मुख्यमंत्री म्हणून नका, म्हणूनच माती झाली - अजित पवार

भावी मुख्यमंत्री म्हणून नका, म्हणूनच माती झाली – अजित पवार

Subscribe

मला भावी मुख्यमंत्री आणि पवार साहेबांना भावी पंतप्रधान म्हणू नका. पक्ष कसा मजबूत होईल याकडे लक्ष द्या. पाडापाडीच्या राजकारणामुळेच आपली माती झाली असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

‘एकच वादा, मुख्यमंत्रीपदी आमचे दादा’ अशा एक ना अनेक घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पावर यांच्याबद्दल दिल्या जातात. अगदी विधानसभा २०१४च्या निवडणुकीमध्ये तर या प्रचारानं जोर पकडला होता. त्यानंतर आता अजित पवार यांनी मला भावी मुख्यमंत्री म्हणून नका, म्हणूनच माती झाली अशी कोटी केली आहे. बारामतीतील एका कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. यावेळी एका नेत्यानं अजित पवारांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री म्हणून केला. मग काय आपल्या खुमासदार शैलीसाठी आणि स्पष्टवक्तेपणासाठीही प्रसिद्ध असलेले अजित पवार यांनी तोच धागा पकडला. यावेळी त्यांनी मला भावी मुख्यमंत्री आणि पवार साहेबांना भावी पंतप्रधान म्हणू नका. पक्ष कसा मजबूत होईल याकडे लक्ष द्या. पाडापाडीच्या राजकारणामुळेच आपली माती झाली असं म्हटलं. त्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

यापूर्वी देखील अजित पवार यांनी अनेक गोष्टींवर आपलं मत स्पष्टपणे व्यक्त केलं आहे. दरम्यान, २००९ साली देखील अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावे लागलं होतं. शिवाय, शरद पवार यांना देखील पंतप्रधानपदाच्या हुलकावणी दिली आहे. मात्र, आज देखील शरद पवारांच्या नावाची चर्चा ही पंतप्रधानपदासाठी होताना दिसते. त्यावर आता अजित पवार यांनी  मला भावी मुख्यमंत्री आणि पवार साहेबांना भावी पंतप्रधान म्हणू नका असा सल्ला कार्यकर्त्यांना दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -