घरलोकसभा २०१९ग्राउंड रिपोर्टनंदूरबारला डॉक्टर - वकिलांची हेवीवेट लढत

नंदूरबारला डॉक्टर – वकिलांची हेवीवेट लढत

Subscribe

काँग्रेसचा गड उद्ध्वस्त करणार्‍या हिना गावितांसमोर अ‍ॅड. पाडवींचे तगडे आव्हान

राज्यभराचे लक्ष लागून असलेल्या नंदूरबार लोकसभा मतदारसंघात भाजपच्या डॉ. हिना गावित आणि अ‍ॅड. के. सी. पाडवी यांच्यात काट्याची लढत होणार आहे. पहिल्यांदाच दोन उच्चशिक्षित म्हणजेच डॉक्टर आणि वकील उमेदवारांत लढत होणार असून, दोघांनाही लढाई जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, यात शंका नाही. काँग्रेसचा गड म्हणून ओळखल्या जाणार्‍या नंदूरबार मतदारसंघात मोदी लाटेत हिना गावित यांनी जोरदार मुसंडी मारत भाजपचा झेंडा रोवला होता. त्यामुळे आता माणिकराव गावित यांच्या जागेवर उमेदवारी करणार्‍या अ‍ॅड. पाडवी यांच्यासमोर काँग्रेसला पुन्हा गड जिंकवून देण्याचे मोठे आव्हान आहे.

माणिकराव गावितांच्या उमेदवारीवर बराच खल झाल्यानंतर काँग्रेसच्या केंद्रीय निवड समितीने होळीच्या दिवशी अ‍ॅड. के. सी. पाडवी यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. यामुळे पाडवी यांचा रूतलेला प्रचाररथ पुन्हा मार्गस्थ झाला. पाडवी यांच्या नावावर सलग सहा वेळा अक्राणी (धडगाव) मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येण्याचा विक्रम आहे. काँग्रेसचे ते विद्यमान प्रदेश उपाध्यक्ष आहेत. पाडवी यांनी यापूर्वी जनता दलातून १९८९ साली लोकसभा निवडणूक लढवली होती. तेव्हा ते पराभूत झाले होते. मात्र, त्यांना १ लाख ३४ हजार ४५९ मते मिळाली होती. दुसर्‍यांदा १९९१ साली जनता दलाच्या तिकिटावरच त्यांनी पुन्हा लोकसभा निवडणूक लढवली, तेव्हा त्यांना २० हजार ५९३ मते मिळाली होती. आता तिसर्‍यांदा ते खासदारकीसाठी उभे आहेत. यासाठी त्यांनी वर्षभरापासून कंबर कसली आहे.

- Advertisement -

मागील लोकसभा निवडणुकीत माजी खासदार माणिकराव गावित यांचा पराभव झाला असून आता त्यांचे वयही अधिक झाले आहे. म्हणून पक्षाच्या वरिष्ठांनीच यंदा उमेदवारी बदलाचे संकेत दिले होते. वयामुळे ज्येष्ठ नेते माणिकराव गावित यांना थांबण्याचा सल्ला होता. त्यांचा गट आता पाडवी यांना खरोखर सहकार्य करेल का यावरदेखील चर्चा झडत आहेत. माणिकराव गावित अ‍ॅड. पाडवी यांना मदत करतील का, यावरही या निवडणुकीचे चित्र निर्भर असेल.

दुसरीकडे तरुण मतदारांमध्ये विशेष प्रभाव असलेल्या विद्यमान खासदार डॉ. हिना गावित या दुसर्‍यांदा निवडणुकीला सामोर्‍या जात आहेत. हिना गावित भाजप विद्यमान आमदार डॉ. विजयकुमार गावित व नंदूरबार जिल्हा परिषद माजी अध्यक्षा डॉ. कुमुदिनी गावित यांच्या कन्या आहेत. त्यांनी 21 मार्च 2014 ला नरेंद्र मोदी आणि राजनाथ सिंह या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे भाजपमध्ये प्रवेश करून आपल्या राजकीय कारकिर्दीचा श्रीगणेशा केला होता. बरोबर त्याच तारखेला पाच वर्षानंतर त्यांना दुसर्‍यांदा त्यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. हिना गावितांची खासदार म्हणून कामगिरीदेखील बोलकी आहे. ‘महिला संसदरत्न’ हा पुरस्कार सलग चार वेळेस त्यांनी प्राप्त केला आहे, ही त्यांच्या उमेदवारीची जमेची बाजू आहे. हिना गावितांनी यापूर्वीच प्रचाराला सुरुवात केली आहे. शिवसेनेच्या पदधिकार्‍यांची नाराजी दूर करून त्यांना जवळ करण्यात हिना यांना यश आले असून गेल्या पाच वर्षात त्यांनी केलेली कामे घेऊन त्या आता पुन्हा मतदारराजासमोर जाणार आहेत. उच्चशिक्षित उमेदवारांमधील ही लढत पाहणे यंदा रंगतदार ठरणार आहे.

- Advertisement -

2009 लोकसभा निवडणूक
पक्ष – उमेदवार – मते
काँग्रेस – माणिकराव गावित – 2,75, 936
समाजवादी पार्टी – शरद गावित – 2, 35, 093
भाजप – सुहास नतवडकर – 1, 95, 987

2014 लोकसभा निवडणूक
पक्ष – उमेदवार – मते
भाजप – हिना गावित – 5,79,486
काँग्रेस – माणिकराव गावित – 4,72581

मतदारसंघातील मतदारांची एकूण संख्या :
1,672,715
पुरुष मतदार : 852,379
मतदारसंघातील मतदारांची एकूण संख्या: 820,336

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -