घरताज्या घडामोडीअन् तात्याराव लहानेंचा संयम सुटला

अन् तात्याराव लहानेंचा संयम सुटला

Subscribe

औषध तुटवडा प्रकरण, खोटे आरोप करणाऱ्यांवर कारवाई होणार

सरकारी हॉस्पिटलमध्ये औषध तुटवड्याच्या प्रकरणावरुन संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी औषध पुरवठा आणि हॉस्पिटलमधील औषधांचा तुटवड्यांबाबत खोटे आरोप करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सरकारी हॉस्पिटल म्हणजेच जे.जे. सेंट जॉर्ज, कामा आणि जीटी या हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांना औषध तुटवड्याचा सामना करावा लागत असल्याचा आरोप केला जातोय. पण, हे सर्व खोटे आरोप होत असल्याचा दावाही डॉ. लहाने यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना केला आहे.

दरम्यान, औषध पुरवठादार आपल्या मागणीवर ठाम असून डॉ. लहाने यांनी ऑडिट करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. गेल्या आठवड्याच्या बुधवारी मध्यरात्रीपासून औषध पुरवठादार संघटनांनी सरकारी हॉस्पिटलमध्ये औषधांचा पुरवठा थांबवला आहे. त्यांच्या या आंदोलनाचा गुरुवारी नववा दिवस होता. आतापर्यंत औषध पुरवठादारांनी अनेकदा थकलेली रक्कम द्यावी यासाठी संपर्क केला होता. थकीत रक्कम न मिळाल्यामुळे औषधपुरवठादारांनी हॉस्पिटलला औषध पुरवठा करणार नाही असा निर्णय घेतला.

- Advertisement -

औषध पुरवठादारांचे ६० कोटी एवढे देयके अद्याप प्रलंबित असल्याचा आरोप करत ही देयके लवकरात लवकर द्यावी यासाठी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय, औषध पुरवठादारांनी सरकारी हॉस्पिटलमधील औषध पुरवठा थांबवला आहे. पुरवठा थांबवल्यापासून याचा परिणाम रुग्णसेवेवर होत असून हॉस्पिटलमध्ये आवश्यक असणारी औषधं देखील उपलब्ध नसल्याचं संघटनेकडून सांगितलं जातंय. पण, हे सर्व आरोप खोटे असून नेमकी किती रुपयांची बिले थकीत आहेत हे शोधण्यासाठी आणि औषधांची देयके देण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे असं डॉ. लहाने यांनी स्पष्ट केलं आहे.

औषध तुटवड्याचा आरोप खोटा 

” हॉस्पिटलमध्ये औषधांचा तुटवडा हा आरोप खोटा आहे. नियमानुसार, हॉस्पिटलमध्ये तीन महिन्यांचा साठा असणं बंधनकारक आहे. त्यामुळे, ज्यांनी हे आरोप केले आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. शिवाय, सद्यस्थितीत सर्व प्रमुख हॉस्पिटलचं ऑडिट सुरू असून जे.जे मध्ये केलेल्या ऑडिटमधून ६ कोटी एवढी थकीत रक्कम समोर आली आहे.
जे ३१ मार्च या तारखेला दिले जाणार होते. शिवाय, अन्य हॉस्पिटलचं ऑडिट जरी केलं तरी ६० कोटी एवढी रक्कम होऊ शकत नाही. त्यामुळे, ज्यांनी हे आरोप केले आहेत त्यांनी खोटी बिलं, खोटी ऑर्डर तयार करुन हे आरोप केलेले आहेत. त्यांनी स्वत: च ऑर्डर काढून आमच्याकडून दिलं गेलंय असं दाखवलं आहे. त्यात जे.जे तील एक फार्मासिस्टचा देखील समावेश असू शकतो. त्यामुळेच ऑडिट करुन यावर योग्य तो निर्णय आणि संबंधित व्यक्तींवर योग्य ती कारवाई केली जाणार आहे. यापुढे कोणत्याही औषधांचा तुटवडा होऊ नये यासाठी पुढच्या तीन महिन्यांची औषधे आधीच मागवली आहेत. अशा रितीने पुढच्या पाच महिन्यांचा साठा आता हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असणार आहे.
डॉ. तात्याराव लहाने
वैद्यकीय, संचालक, शिक्षण आणि संशोधन संचालनालय

- Advertisement -

दरम्यान या सर्व प्रकरणानंतरही औषध पुरवठादार आपल्या भूमिकेवर ठाम असून हॉस्पिटलच्या ऑडिट होण्याच्या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं आहे.

६० कोटींची थकीत बिलं
” आमची थकीत बिलं ६० कोटी रुपयांची आहेत. त्यांनी ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा आम्हाला आनंद आहे. व्याजासह आमचे ६० करोड रुपये येणं बाकी आहे. आता आम्हाला व्याज ही हवं आहे. औषध पुरवठा केला आहे म्हटल्यानंतर आम्हाला पैसे मिळणं ही गरजेचं आहे.

अभय पांडे
राष्ट्रीय अध्यक्ष,
ऑल इंडिया फूड अँड ड्रग्ज लायन्सस होल्डर्स फाउंडेशन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -