चपळ कुत्र्यांनी बिबट्यापासून वाचवले आपले प्राण

चपळ कुत्र्यांनी बिबट्यापासून बचाव करत आपले प्राण वाचवले आहेत.

Shrirampur
Dog saves his life from leopard
चपळ कुत्र्यांनी बिबट्यापासून वाचवले आपले प्राण

भक्ष्याच्या शोधात असलेल्या बिबट्याला समोर कुत्रे दिसल्याने त्याच्यावर हल्ला चढविला. मात्र, त्याच्या तावडीतून कुत्रा चपळाईने निसटला. त्यानंतर या बिबट्याने पुन्हा कुत्र्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला आणि बिबट्या विहिरीत पडला. ही घटना बुधवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली. त्यानंतर बिबट्याने विहिरीतून बाहेर येण्याचे असंख्य प्रयत्न केले. मात्र, त्याला बाहेर पडता आले नाही. अखेर या बिबट्याला यशस्वीरित्या पहाटे ३.३० च्या सुमारास बाहेर काढण्याच वनविभागाला यश आले आहे.

नेमके काय घडले?

श्रीरामपूरच्या बेलापूर परिसरात असलेल्या गोखलेवाडी शिवारात बुधवारी रात्री आठ वाजता प्रकार घडला. गोखले वाडीतील बबन दाणी यांच्या वस्तीवर भक्ष्याच्या शोधात बिबट्या आला होता. वस्तीवरील कुत्र्यावर त्याची नजर गेली आणि त्याने कुत्र्यावर हल्ला चढविला. हल्ल्यातून निसटलेल्या कुत्र्याने पळ काढताच त्याचा पाठलाग करत असलेला बिबट्या जवळच्या विहिरीत पडला. हा प्रकार दाणी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी लगेच याची माहिती आजूबाजूच्या शेतकऱ्यांसोबत जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, बाजार समितीचे सदस्य सुधीर नवले यांना दिली. त्यानंतर वन विभागाशी संपर्क साधण्यात आला. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी उक्कलगाव येथून पिंजरा मागवत बिबट्यालावर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. दाणी यांच्यासह बाळासाहेब भुजाडी, प्रकाश मेहेत्रे, वाल्मीक भुजाडी, विजय बर्डे, राजेंद्र बर्डे, दत्तू सरोदे, संजय भुजाडी, सोहम लगे, गणेश मेहेत्रे, गोरख काळे, अशोक शेळके, भास्कर वाघ आदींनी जेसीबीच्या सहाय्याने आणलेला पिंजरा विहिरीमध्ये सोडला. पिंजरा विहिरीमध्ये सोडत असताना त्याच्या कड्या तुटल्या. कसाबसा पिंजरा विहिरीत सोडल्यानंतर बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू झाले. पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास पिंजऱ्यात आलेल्या बिबट्याला वर काढण्यात यश आले. वनरक्षक ए. आर. पवार यांच्याशी ‘आपलं महानगर’ने संपर्क साधला असता हा बिबट्या साधारणत चार वर्षाचा असल्याची माहिती देण्यात आली आहे.


हेही वाचा – देशापाठोपाठ मुंबईतील सोसायट्यांनीही स्वत:ला केले ‘लॉकडाऊन’


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here