घरCORONA UPDATEबापरे! इस्लामपूरमध्ये कोरोनाबाधित रुग्णाच्या मृतदेहाचे भटक्या कुत्र्यांनी तोडले लचके

बापरे! इस्लामपूरमध्ये कोरोनाबाधित रुग्णाच्या मृतदेहाचे भटक्या कुत्र्यांनी तोडले लचके

Subscribe

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या मृतदेहांची हेळसांड सुरूच आहे. अशीच एक घटना इस्लामपूरमधून समोर आली आहे. इस्लामपूर नगरपरिषदेच्या स्मशानभूमीत करोनाबाधित प्रचंड अंत्यसंस्कार केल्यानंतर अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे लचके तोडणाऱ्या कुत्र्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे इस्लामपूर नगरपरिषद आणि जिल्हा प्रशासनाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. या घटनेने संताप व्यक्त केला जात आहे.

इस्लामपूरमधील हा गंभीर प्रकार मृताच्या एका नातेवाईकानेच मोबाइलमध्ये चित्रीत केला. यामुळे हा प्रकार समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात झाला आहे. या व्हिडीओद्वारे त्यांनी पालकमंत्री जयंत पाटील आणि जिल्हा प्रशासनाला जाब विचारला आहे. इस्लामपूरमध्ये कोरोनाबाधित मृतदेहांवर नगरपरिषदेच्या कापुसखेड नाका परिसरातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातात. मात्र, गेल्या १५ दिवसांपासून मृतांची संख्या वाढल्याने अंत्यसंस्कार करणाऱ्या यंत्रणांवर ताण पडल्याने कोलमडल्या आहेत.

- Advertisement -

कोरोनाबाधित रुग्णाला व्हेंटिलेटरची गरज होती, मात्र शिराळा तालुक्यात व्यवस्था नसल्याने नातेवाईकांनी रुग्णाला इस्लामपूर शहरातील एका कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केलं होतं. ३४ हजार रुपये भरूनही रुग्णाला व्हेंटिलेटर मिळाला नसल्याने गुरुवारी सकाळी रुग्णाचा मृत्यू झाला. यानंतर रुग्णालय प्रशासनाने मृतदेह अंत्यसंस्कारासाठी इस्लामपूर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांकडे सोपवला. नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी घाईगडबडीत अंत्यसंस्कार उरकून घेतले. यानंतर दुसरा मृतदेह आणण्यासाठी ते निघून गेले. दरम्यान, स्मशानभूमीत आलेल्या नातेवाईकांना अर्धवट जळालेला मृतदेह पाहून धक्का बसला. गंभीर बाब म्हणजे भटके कुत्रे अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे लचके तोडत होते. हा सर्व प्रकार पाहून नातेवाईकांनी मोबाइलवर चित्रीकरण केलं. या प्रकरामुळे पुन्हा एकदा कोरोनाबाधित रुग्णांच्या मृतदेहांची हेळसांड होत असल्याचं अधोरेखीत झालं आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -