ऐन सुट्टीत मुलांच्या खेळावर गदा; डोंबिवली क्रिडासंकुल निवडणूक विभागाच्या ताब्यात

डोंबिवली क्रिडासंकुल निवडणूक विभागाच्या ताब्यात असल्याने खेळाडूंमध्ये नाराजी सूर दिसत आहे.

Mumbai
डोंबिवली क्रिडासंकुल निवडणूक विभागाच्या ताब्यात

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवली क्रिडासंकुलाचा ताबा निवडणूक विभागाने घेतल्याने निवडणूक होईपर्यंत मुलांना खेळता येणार नाही. त्यामुळे ऐन सुट्टीत मुलांच्या खेळावर गदा आल्याने मुलांमध्ये नाराजी पसरली आहे.  कल्याण लोकसभा मतदार संघाचे मतदान २९ एप्रिलला पार पडणार आहे. डोंबिवली क्रिडासंकूलाची खूप मोठी जागा आहे. त्यामुळे निवडणूकीचे साहित्य ठेवण्यासाठी तसेच  निवडणुकीच्या कामासाठी बाहेरून येणा-या कर्मचा-यांकरिता या ठिकाणी सोय  केली जाणार आहे.

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसोबत   जिल्हाधिकारी राजेंद्र नार्वेकर यांनी निवडणूकीच्या कामासाठी डोंबिवली क्रिडासंकूल उपलब्ध व्हावे. या संदर्भात पालिका आयुक्तांना सुचना केल्या होत्या, त्यानुसार दोन दिवसांपूर्वीच निवडणूक आयेागाने या क्रिडासंकुलाचा ताबा घेतला आहे. त्यामुळे एप्रिल- मे महिन्यात शाळा, कॉलेजला सुट्टी पडल्यानंतर खेळाडूंना क्रिडासंकुलात खेळाचा आनंद लुटता येणार नाही. 

यावर बसणार निर्बंध 

क्रिडासंकुलात बंदिस्त क्रिडागृह, व्यायामशाळा, तरण तलाव आदींवर गदा येणार आहे. तरण तलावात सहाशेच्या आसपास आजीवन सदस्य असून उन्हाळी सुट्टीत तरण तलावाचा उपभोग घेण्यासाठी दिवसभरात पाचशेच्या आसपास संख्या आहे. त्यामुळे व्यायामशाळा व तरण तलावावर निर्बंध टाकू नका अशी मागणी देखील काही लोकप्रतिनिधींनी आयुक्तांकडे केली होती. मात्र निवडणूक विभागाने क्रिडासंकुलाचा ताबा घेतला असल्याने ऐन सुट्टीत मुलांच्या खेळाचा आनंद हिरावला जाणार आहे. 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here