घरदेश-विदेशदेशांतर्गत विमान सेवा २५ मेपासून सुरू होणार

देशांतर्गत विमान सेवा २५ मेपासून सुरू होणार

Subscribe

देशभरातील विमानसेवा २५ मेपासून सुरू केली जाणार आहे. नागरी उड्डाण मंत्री हरदीप पुरी यांनी ट्विट करून याबद्दलची माहिती दिली आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद करण्यात आली होती. मात्र आता सरकारने देशांतर्गत हवाई वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

सोमवारपासून (२५ मे) देशांतर्गत हवाई वाहतूक सुरू होणार असल्याची माहिती नागरी उड्डाण मंत्री यांनी ट्विटरवर दिली. याबद्दल सर्व विमानतळांना सूचना दिल्या जात आहेत. हवाई वाहतूक सुरू करण्याची जबाबदारी केंद्र सरकारसोबतच राज्य सरकारांचीदेखील असल्याचे ट्विट पुरी यांनी मंगळवारी केले आहे. राज्य सरकारांनादेखील यासाठी तयारी करावी लागेल, असे त्यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.

- Advertisement -

२५ मेपासून देशात लॉकडाऊन सुरू आहे. तेव्हापासून विमान उड्डाणे बंद आहेत. सध्या लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू असून तो ३१ मे रोजी संपेल. देशातील वाहतूक सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सरकारकडून टप्प्याटप्प्याने सुरू आहेत. देशभरात अडकलेल्या मजुरांसाठी श्रमिक विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. १ जूनपासून दररोज २०० नॉन एसी गाड्या वेळापत्रकानुसार चालवल्या जाणार असल्याची माहिती रेल्वेने मंगळवारीच दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -