घरमहाराष्ट्र'गणेश मूर्ती दान करा, मोफत खत मिळवा'; पुणे पालिकेचा स्तुत्य उपक्रम

‘गणेश मूर्ती दान करा, मोफत खत मिळवा’; पुणे पालिकेचा स्तुत्य उपक्रम

Subscribe

पुणे मनपाचे माजी उप आयुक्त अनिल पवार यांनी देखील मूर्ती दान करत पालिकेच्या उपक्रमाला पाठिंबा दर्शवला.

पुणे मनपातर्फे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा म्हणून यंदा विशेष प्रयत्न करण्यात आले. कृत्रिम हौद, घरच्या घरी गणेश विसर्जन या बरोबरच मूर्तीदान ही संकल्पना राबवण्यात आली. यंदा पुणे महापालिकेकडून गणेश मूर्ती दान करा आणि मोफत खत मिळवा असा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत शहरातील कचऱ्यापासून निर्माण केलेले दोन किलो कंपोस्ट खत मूर्तीदान करणाऱ्यांना मोफत देण्यात आले. विशेष म्हणजे पुणे मनपाचे माजी उप आयुक्त अनिल पवार यांनी देखील मूर्ती दान करत पालिकेच्या उपक्रमाला पाठिंबा दर्शवला.

हेही वाचा – पुण्यात विसर्जनावेळी बुडणाऱ्या ४ गणेशभक्तांना वाचवलं

माजी उप आयुक्तांचा उपक्रमाला पाठिंबा

या उपक्रमासाठी भूमीग्रीन यांनी पुढाकार घेतला. वृधेश्वर घाट, शिवाजीनगर, पटवर्धन समाधी घाट, कात्रज रॅम्प व येरवडा लुंबीनी उद्यानात सोबत शहरात इतरत्र हा उपक्रम राबवला. वृध्देश्वर घाट व पटवर्धन घाट येथे खत वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे पुणे मनपाचे माजी उप आयुक्त आणि ठाण्याचे अप्पर जिल्हाधिकारी अनिल पवार यांनी देखील त्यांच्या गणरायाच्या मूर्तीचे दान करत पालिकेच्या उपक्रमाला पाठिंबा दर्शवला. यावेळी लुंबीनी उद्यानात उपमहापौर डॉ.सिध्दार्थ धेंडे यांनी मूर्ती स्विकारल्या तसेच नागरिकांना खताचे वाटप केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -