घरCORONA UPDATEअपघात सहाय्यता निधीतून १० लाख रुपयांची मदत करा - हिरेन रेडकर

अपघात सहाय्यता निधीतून १० लाख रुपयांची मदत करा – हिरेन रेडकर

Subscribe

कुटूंबियांना राज्य शासनाची ५० लाख रुपये मदत मिळण्यापुर्वी एसटी महामंडळाने अपघात सहाय्यता नीधीतुन १० लाख रुपये तातडीने मदत करावी.

नुकतेच झारखंड येथे मजदुरांना सोडण्यासाठी सोलापूर आगाराच्या बसला यवतमाळ जिल्ह्यात आरणी तालुक्यातील कोळवण गावाजवळ एसटी बसचा गंभीर अपघात होऊन चालक सुनिल शिंदे यांच्या जागीच मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटूंबियांना राज्य शासनाची ५० लाख रुपये मदत मिळण्यापुर्वी एसटी महामंडळाने अपघात सहाय्यता नीधीतुन १० लाख रुपये तातडीने मदत करावी. तसेच मृत कुटुंबात एकमात्र कमावता आधार गेल्याने त्यांच्या अवलंबितास अनुकंप तत्वावर एसटी महामंडळात त्वरित नोकरी देण्याची मागणी महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे सरचिटणीस हिरेन रेडकर यांनी प्रशासनाकडे केली आहे.

राज्य शासनाच्या विमा संरक्षण या तरतुदीचा लाभ एसटी कामगारांनाही मिळावी, अशी मागणी एसटी कामगार सेनेने ६ एप्रिल २०२० रोजीच्या पत्रान्वये यापूर्वीच एसटी महामंडळाकडे केली आहे. कोविड- १९ च्या काळातील अत्यावश्यक सेवा देणाऱ्या राज्य शासनाच्या तसेच बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या मृत कर्मचाऱ्यांना ५० लाख रुपये विमा कवचाची सुविधा दिल्याची घोषणा केली आहे. अत्यावश्यक सेवा देताना अपघातात मृत्यू पावलेल्या सुनिल शिंदे यांनाही या तरतुदीचा लाभ मिळावा यासाठी त्यांच्या वारसांना ५० लाखाची रक्कम नुकसान भरपाई पोटी तात्काळ मिळणे गरजेचे आहे. तसेच राज्य शासनाकडून ५० लाख रुपये नुकसान भरपाई मिळण्यापूर्वी एसटी महामंडळाने १० लाख रुपये नुकसान भरपाई अपघात सहाय्यता निधीमधून तात्काळ द्यावी, अशा मागणीचे पत्रक महाराष्ट्र एसटी कामगार सेनेकडून एसटी महामंडळाच्या उपाध्यक्ष व व्यस्थापकीय संचालक यांना देण्यात आहे. तसेच कोविड-१९ च्या काळात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये शासकीय निमशासकीय असा भेदभाव न करता या संकटकाळात सेवा देणाऱ्या प्रत्येक कामगारांच्या या सुविधा देण्यात यावीत, अशी प्रतिक्रिया सुद्धा महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे सरचिटणीस हिरेन रेडकर यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -