घरमहाराष्ट्रभाजप नेत्यांना दारातही उभे करू नका

भाजप नेत्यांना दारातही उभे करू नका

Subscribe

सुजलाम सुफलाम महाराष्ट्र आज दीनवाण्यास्थितीत आला आहे. शेतकर्‍यांपासून, कामगार, कष्टकर्‍यांचे जगणे अवघड बनत चालले आहे. महागाई गगनाला भिडली आहे. राज्यात शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचे सत्र थांबता थांबत नाही. शेती कशाने खातात याचीच माहिती नसलेले शेतकर्‍याच्या विषयावर नको इतके ऊर बडवत आहेत. हे नेते तुमच्याकडे मते मागायला येतील. तेव्हा त्यांना दारात उभे करू नका, असा घणाघात हल्ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. ते काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार सभेत बोलत होते.

भाजपला शेतकरी आणि शेती यांच्याबाबत काहीही आस्था नाही, त्यामुळे त्यांना दारात उभेही करु नका. शेतकर्‍यांना दोन पैसे मिळण्याची वेळ आली तेव्हा या सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतला. हा निर्णय म्हणजे अक्कलेचे दिवाळे आहे, अशी टीका करताना या सरकारला शेतकर्‍यांकडून मते मागण्याचा अधिकारच राहिला नसल्याचे पवार म्हणाले. शेतकरी कामगारांना रस्त्यावर आणणार्‍यांना मते देऊ नका, मते मागायला आले तर त्यांना दारातून परतवा, असे आवाहन पवार यांनी केले. राज्यभरात कृषी क्षेत्राची होत असलेली पिछेहाट, बंद पडत असलेले कारखाने यामुळे राज्यातील बेकारांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यातून मार्ग काढण्याऐवजी नको त्या विषयाचा बगुलबुवा करण्यात सत्ताधारी मश्गूल असल्याचे पवार म्हणाले.

- Advertisement -

पारनेर येथील जाहीर सभेतही पवारांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. भाजपा-सेना सरकारमधील लोकांना शेतीतील प्रश्नांची जाण नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सरसकट कर्जमाफीची घोषणा केली. मात्र अजून कुणालाही कर्जमाफी मिळालेली नाही. आघाडी सरकारच्या काळात अशी परिस्थिती उद्भवली असता आम्ही चर्चा करत बसलो नाही, थेट 71 हजार कोटींची कर्जमाफी दिली, अशी आठवण त्यांनी करून दिली. जो शेतकर्‍यांकडे दुर्लक्ष करतो त्यांना मत देणार नाही, अशी भूमिका आपण घ्यायला हवी. सरकारच्या मनात आले आणि नोटाबंदी केली.

एटीमच्या रांगेत उभे राहून 100 लोकांचे जीव गेले, नोटाबंदीने काय उपयोग झाला? काळापैसा गेला कुठे? असे प्रश्न उपस्थित करत आंदोलकांना जेरबंद केले जात आहे. आम्हालाही खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न झाला. हिंमत असेल तर अटक करा, असे आव्हान पवार यांनी यावेळी दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -