Wednesday, January 27, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र सूडबुद्धीचे राजकारण नको : उपमुख्यमंत्री पवार

सूडबुद्धीचे राजकारण नको : उपमुख्यमंत्री पवार

कोरोनाबाबत नाशिकमध्ये घेतली आढावा बैठक

Related Story

- Advertisement -

सरकार येतात आणि जातात. त्यामुळे ईडीसारख्या कारवाईच्या माध्यमातून कुणी सूडबुद्धीने राजकारण करू नये, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रातील भाजप सरकारचे नाव न घेता लगावला.

नाशिकमध्ये कोरोनासंदर्भात रविवारी (दि.३) आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार बोलत होते. ईडीच्या मुद्यावर ते म्हणाले की, तुम्हाला जे वाटते आहे तेच मलाही वाटते. मात्र, सरकार येते आणि जातेही. त्यामुळे उगाच कुणी सूडबुद्धीने राजकारण करू नये. कारवाईला विरोध नाही, मात्र त्यात राजकीय हस्तक्षेप नको. दरम्यान, शेतीच्या नुकसान पाहणीसाठी केंद्राचे पथक खूप उशीरा राज्यात आले. दोन-दोन महिने हे पथक येत नाही, याबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शेती नुकसानप्रश्नी मुख्यमंत्र्यांनी तातडीने १० हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले होते, असेही त्यांनी सांगितले.

पार्थचे नाव नसेल, विषय बंद करा

- Advertisement -

पार्थ पवारांसंदर्भातील वृत्त पूर्णपणे खोटे आहे. कारण, भालकेंच्या जागी पार्थ पवारांचे नाव नसेल. त्यामुळे हा विषय इथेच बंद करा, असेही अजित पवारांनी स्पष्ट केले. दरम्यान, चार जिल्ह्यामध्ये कोरोना व्हॅक्सिनचा ड्राय रन सुरू आहे. नंदुरबारच्या एका गावात याबाबत अडचण आली. सरकार कुणाचेही असले तरी लस ठराविक एखाद्या पक्षाची नाही. हा माणसांच्या जीवाचा प्रश्न आहे. त्यामुळे यात राजकारण आणू नये, असेही पवारांनी सांगितले. अन्न नागरी, मदत पुनर्वसन आणि पोलीस या महत्त्वाच्या विभागांच्या निधीला कोणतीही कात्री लावण्यात येणार नाही. एमटीडीसीच्या काही अडचणीत आहेत का, हे जाणून घेतल्या आहेत. स्थानिक विकास निधीला कोणताही कात्री लागणार नाही. कोरोनामुळे राज्यासमोर आर्थिक अडचण आहे.

औरंगाबाद नामांतरणाबाबत मार्ग काढू

औरंगाबाद शहराच्या नामकरणाबाबत तिन्ही पक्षाचे नेते बसून मार्ग काढतील. महाविकास आघाडी सरकारमध्ये फूट पडावी, यासाठी काही व्यक्ती जाणीवपूर्वक वेगवेगळे मुद्दे पुढे करण्याचा प्रयत्न करत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -