Tuesday, January 12, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र डाऊन टू अर्थ; सुप्रिया सुळेंनी खडसेंच्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम कार्यकर्त्यांसोबत पाहिला

डाऊन टू अर्थ; सुप्रिया सुळेंनी खडसेंच्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम कार्यकर्त्यांसोबत पाहिला

Related Story

- Advertisement -

भाजपचे माजी नेते एकनाथ खडसे यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला. पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम होत असताना कोरोनामुळे काही नियमांचं पालन करण्यात आलं. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयाचा हॉल आहे, त्या हॉलमध्ये मर्यादीत ५० पदाधिकाऱ्यांना बसण्याची अनुमती देण्यात आली होती. तसंच व्यासपीठावरती राष्ट्रवादीचे प्रमुख नेते, एकनाथ खडसे यांच्या सोबत जे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार होते त्यांना व्यासपीठावर जागा देण्यात आली होती. पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे या नेहमीच बॅकस्टेज सांभाळण्यात व्यस्त असतात. आतापर्यंतच्या पक्षाच्या कार्यक्रमात सुप्रिया सुळे बॅकस्टेज सांभाळताना दिसल्या आहेत. त्या व्यासपीठावर कधीच बसत नाहीत. आज देखील पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाला सुप्रिया सुळे बाहेर बसललेल्या दिसल्या.

पक्षप्रेवशाचा कार्यक्रम सुरु असताना बाहेर पत्रकारांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी बाहेर एलसीडी लावण्यात आल्या होत्या. शरद पवार आणि एकनाथ खडसे यांना माध्यमांना हात दाखवण्यासाठी एक स्टेज तयार करण्यात आला होता. सुप्रिया सुळे सुरुवातीपासून या स्टेजवर ठाण मांडून बसल्या होत्या. कार्यकर्त्यांसोबतच पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम त्यांनी स्टेजवर बसून पाहिला. कार्यकर्त्यांना सूचना देण्याचं काम देखील तिथऊन करत होत्या. सुप्रिया सुळेंच्या डाऊन टू अर्थ स्वभावाची आणि कार्यकर्ता होऊन काम करण्याच्य पद्धतीला कार्यकर्ते नेहमीच पसंत करतात. यामुळेच सुप्रिया सुळे तरुणांमध्ये लोकप्रिय आहेत.


- Advertisement -

हेही वाचा – कुणाचाही राजीनामा घेणार नाही, कुणीही नाराज नाही – शरद पवार


 

- Advertisement -