घरमहाराष्ट्रअमोल कोल्हेंनी घेतली राज ठाकरेंची भेट, कारण गुलदस्त्यात!

अमोल कोल्हेंनी घेतली राज ठाकरेंची भेट, कारण गुलदस्त्यात!

Subscribe

राष्ट्रवादीचे खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली असून भेटीचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे. राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी ही भेट झाली. दरम्यान अमोल कोल्हे यांनी ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले.

विधानसभेत मनसेला सोबत घेण्यासाठी राष्ट्रवादी इच्छुक

दरम्यान विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसेल सोबत घ्यावे अशी भावना राष्ट्रवादी कॉंग्रेसची असून, राज ठाकरे यांचा फायदा लोकसभेला जरी झाला नसला तरी विधानसभेला नक्कीच होईल असे राष्ट्रवादीला वाटत आहे. त्यामुळे विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान आज अमोल कोल्हे यांच्या भेटीने पुन्हा एकदा मनसे राष्ट्रवादी सोबत जाणार का अशी चर्चा रंगू लागली आहे.

- Advertisement -

अमोल कोल्हे यांच्याविषयी थोडक्यात

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिरुरमधून तीन वेळा निवडून आलेल्या खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा अमोल कोल्हे यानी ५८ हजार ४८३ मतांनी दणदणीत पराभव केला होता. तसेच अमोल कोल्हे यांची ‘स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज’ ही मालिका सध्या गाजत आहे. या मालिकेतील संभाजी महाराजांच्या भूमिकेचा देखील त्यांना फायदा झाल्याचे बोलले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -