घरमहाराष्ट्र'संभाजी महाराजांचा इतिहास जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवेल'

‘संभाजी महाराजांचा इतिहास जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवेल’

Subscribe

छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने हजारोंच्या संख्येने शंभू प्रेमींनी संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी गर्दी केली होती.

‘छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचविण्यास मी कटीबद्ध आहे’, असे डॉ. अमोल कोल्हे म्हणाले आहेत. आज छत्रपती संभाजी महाराज यांची पुण्यतिथी आहे. या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून त्यांच्या तुळापूर येथील समाधी पुढे शंभू प्रेमी नतमस्तक होत आहेत. यावेळी राष्ट्रवादी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आणि शंभू महाराज यांची भूमिका साकारणारे अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी आदरांजली वाहिली. छत्रपती शंभू राजे यांचा इतिहास हा संपूर्ण देशातच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचवायचा असल्याचे ते म्हणाले. छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने हजारोंच्या संख्येने शंभू प्रेमींनी संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी गर्दी केली होती. बहुतांश शंभू प्रेमी हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आले होते. यावेळे राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे देखील आले होते. त्यांनी समाधी स्थळी हजेरी लावताच तरुणांमध्ये जल्लोष दिसला.

नेमकं काय म्हणाले डॉ. अमोल कोल्हे?

‘हे राजकीय व्यासपीठ नाही त्यामुळे राजकीय बोलणार नाही. एक सच्चा शंभू भक्त म्हणून मातीला नतमस्तक होण्यासाठी मी इथे आलो आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास पोहचवण्याच्या दृष्टीने जो काही खारीचा वाटा उचलतोय, ते तुमच्या विश्वासावर आणि प्रेमापोटी उचलत आहे. शंभू राजांचा इतिहास हा संपूर्ण देशातच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचविण्यासाठी मी कटीबद्ध आहे’, असं अमोल कोल्हे म्हणाले आहेत.

- Advertisement -

बापट आणि कोल्हे यांची गळाभेट

सध्या लोकसभेची धामधूम सुरू आहे. आज छत्रपती संभाजी महाराज यांची पुण्यतिथी असल्याने अनेक राजकीय नेते शंभू राजेंचा समाधीला आदरांजली वाहण्यासाठी आले होते. त्यात पालकमंत्री आणि भाजपचे पुणे लोकसभेचे उमेदवार गिरीश बापट हे देखील उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादीचे शिरूर लोकसभा उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांची गिरीश बापट यांनी गळाभेट घेतल्याचं पाहायला मिळालं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -