घरमहाराष्ट्रबस चालकाचं प्रसंगावधन, प्रवाशांचे वाचले प्राण

बस चालकाचं प्रसंगावधन, प्रवाशांचे वाचले प्राण

Subscribe

एसटी चालक आणि वाहकानं दाखवलेल्या प्रसंगवधनामुळे मोठा अनर्थ ठरला आहे. त्यामुळे प्रवाशांचे प्राण देखील वाचले.

सकाळी नऊची वेळ….सांगोलातील काही मोजक्या प्रवाशांना घेऊन एमएच १४ बीटी ३१२९ ही एसटी बस नेहमीप्रमाणे अहमदनगरकडे निघाली….एसटीमध्ये काही गर्दी नव्हती केवळ पाचचं माणसं होती…त्यामुळे बसनं देखील काहीसा वेग धरला होता…त्याच वेगानं रस्ता कापत एसटी खर्डी गावातील गतिरोधकाजवळ आली…चालकानं कचकचून ब्रेक मारला…प्रवाशांना काही कळेना….नेमकं झालं काय? कारण गतिरोधक असलं म्हणून ऐवढ्या जोरात कचकचुन ब्रेक मारायची काहीच गरज नव्हती. पण, चालकानं मोठं प्रसंगावधन दाखवलं होतं. कारण एसटीच्या बॅटरीनं पेट घेतला होता…चालक सचिन मुंडे यांना या गोष्टीचं गांभीर्य लक्षात आलं….त्यांनी झराझर प्रवाशांना खाली उतरवलं….तोवर गावात देखील वाऱ्याच्या वेगानं ही बातमी पसरली होती….गावातील सिद्धनाथ पोफळे, अय्युब आतार, लखन घाडगे, महादेव रोंगे, आबा रोंगे आदी मंडळी जमली आणि त्यांनी आग विझवण्यास मदत केली. कोण पत्रा कापतोय….तर कोण पाणी मारतंय…अखेर आगीवर नियंत्रण मिळवलं गेलं. त्यामुळे मोठा अनर्थ देखील टळला. त्यानंतर प्रवाशांना दुसऱ्या एसटीनं पुढच्या प्रवाशासाठी पाठवलं गेलं. ग्रामस्थ देवासारखे तर धावून आले पण, चालक आणि वाहकांनी दाखवलेल्या प्रसंगवधनाला तोड नाही. त्यामुळे चालक सचिन मुंजे आणि वाहक भारत कुंभार यांच्यावर देखील आता कौतुकाचा वर्षाव होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -