घरमहाराष्ट्रमहिंद्रा ग्रुपच्या ऑटो म्युझियममध्ये ड्रॉयव्हरलेस ट्रॅक्टर

महिंद्रा ग्रुपच्या ऑटो म्युझियममध्ये ड्रॉयव्हरलेस ट्रॅक्टर

Subscribe

महिंद्रा ग्रुपने एक ड्रायव्हरलेस ट्रॅक्टरची निर्मिती केली आहे. ज्याचा सर्वात जास्त फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो असं मत ‘महिंद्रा अँड महिंद्रा’ कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक ‘पवन गोयंका’ यांनी मांडलं आहे. वेगवेगळ्या पद्धतीने कामे करण्यासाठी हा चालकविरहीत ट्रॅक्टर शेतकऱ्यांना मदत करु शकेल. शेतीच्या कामाव्यतिरिक्त शेतकरी दुसऱ्या कामासाठी त्यांचा वेळ वापरु शकतात. शिवाय, या ट्रॅक्टरमुळे देशाची प्रगती आणखी होण्यास मदत होऊ शकणार आहे, असंही पवन गोयंका यांनी सांगितलं आहे.

महिंद्राच्या चेन्नई येथील रिसर्च व्हॉलीमध्ये हा चालकविरहीत ट्रॅक्टर आहे. गेल्याकाही काळापासून भारताला अत्यंत गरजेचा असलेला हा चालक विरहीत ट्रॅक्टर महिंद्रा रिसर्च व्हॉलीमध्ये आहे. त्यावर सध्या चाचणी सुरू आहे. हा ट्रॅक्टर शेतकऱ्यांना नक्की पसंतीस पडेल.

- Advertisement -

ट्रॅक्टरसाठी रिसर्च टीम कार्य कर्यरत
ड्रॉयव्हरलेस ट्रॅक्टर सर्वच शेतकऱ्यांना परवडेल असं नाही. परंतु योग्य वापरकरत्यापर्यंत हा ट्रॅक्टर पोहचला पाहीजे. त्यासाठी रिसर्च टीम कार्य करत आहे. त्याप्रमाणे भाड्याने देण्यासाठी भविष्यात एक मॉडेल असू शकते. त्याचप्रमाणे आता वापरा व नंतर भाडे द्या अशीही सोय या ट्रॉक्टर वापरासाठी असेल. त्यामुळे शेतकरी शेतीच्या कामासाठी त्याचा वापर करतील आणि पिकांची विक्री करून नंतर पैसे देऊ शकतील. खरं तर, केंद्र व राज्य सरकार देखील याबाबत काही शेतकरी अनुकूल योजना तयार करू शकतील. “हे बजेट अनुकूल असले पाहिजे. त्यासाठी रिसर्च टीम काम करत आहे. गुगल आधीपासूनच ड्रायव्हर नसलेल्या कारवर जागतिक स्तरावर काम करत आहे. चालक विरहीत ट्रॉक्टर शेतकऱ्यांना अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकतो. त्यांना त्याच्या इतर कामात वेळ मिळेल. हे आपल्या देशाच्या प्रगतीसाठी एका अर्थाने बहुमोल असेही असेल.” असे मत ‘महिंद्र अँड महिंद्र’चे व्यवस्थापकीय संचालक ‘पवन गोयंका’ यांनी व्यक्त केले.

शेतकऱ्यांच्या लाभासाठी ‘सो दि फ्युचर’कॅम्प
महिंद्रा ट्रॅक्टर्स नेहमीच कृषीक्षेत्रात तंत्रज्ञानाने सक्षम उत्पादने तयार करण्यात अग्रेसर असते. महिंद्राने काही काळा पूर्वी ‘सो दि फ्युचर’ नावाचे एक कॅम्पेन राबवले होते. संपूर्ण देशातील शेती व्यवसायातील काही प्रेरणादायी कथा प्रकाशझोतात आणण्यासाठी महिंद्राने घेतलेला पुढाकार आहे. या पुढाकारामुळे महिंद्रा शेतकऱ्यांच्या लाभासाठी उत्तम पद्धती आणि तंत्रे समोर आणत आहे.

- Advertisement -

आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्येही वापरणार तंत्रज्ञान
भारताला अशा अनेक नविन प्रकल्पांची आवश्यकता आहे, जसे की ड्रायव्हरलेस ट्रॅक्टर. या संदर्भात अधिक उद्योजकांनी त्यांच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे. महिंद्रा ग्रुप केवळ भारतातच नव्हे तर जपान व अमेरिकेसारख्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये हे तंत्रज्ञान वापरणार आहे. यामुळे महिंद्रा ट्रॅक्टर्सला जागतिक बाजारपेठेत तांत्रिक सुधारणांबरोबर एक अद्वितीय स्पर्धात्मक फायदा मिळेल, अशी प्रतिक्रिया गोयंका यांनी दिली.

महिंद्रा रिर्सच व्हॅलीमध्ये सध्या सुरू असलेले नविन प्रोजेक्ट
यामध्ये लहान व्यावसायिक वापरासाठी वाहने, तसेच युटिलिटी व्हेइकल (यूव्ही) आणि स्पोर्ट्स युटिलिटी व्हेइकल (एसयूव्ही) यांचा समावेश आहे. रिसर्च सेंटर हे लाइट कमर्शियल व्हेइकल वरही काम करत आहे, जे नवीन प्लॅटफॉर्मवर आधारित असेल.सध्या त्यावर काम सुरू झाले आहे आणि उत्पादन सुरू करण्यासाठी तीन ते साडे तीन वर्षे लागतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -