घरमहाराष्ट्रजिल्ह्यातील ४५ महसुल मंडळात दुष्काळी परिस्थिती जाहीर

जिल्ह्यातील ४५ महसुल मंडळात दुष्काळी परिस्थिती जाहीर

Subscribe

मंत्रालयाच्या निर्णयानुसार राज्यातील १५१ तालुक्यामध्ये दुष्काळ घोषीत करण्यात आला होता. लातूर जिल्हयाच्या १० तालुक्यातील ४५ महसूली मंडळात सन २०१८-१९ या वर्षाकरिता दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली.

मंत्रालयाच्या निर्णयानुसार राज्यातील १५१ तालुक्यामध्ये दुष्काळ घोषीत करण्यात आला होता. या तालुक्याव्यतीरिक्त इतर तालुक्यामधील ज्या महसुली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीत तालुक्याच्या सरासरी पर्जन्याच्या ७५ टक्के पेक्षा कमी व एकूण पर्जन्य्‍मान ७५० मि.मि. पेक्षा कमी झाला आहे त्या महसुली मंडळामध्ये दुष्काळ जाहीर करावयाचा आहेत. लातूर जिल्हयाच्या १० तालुक्यातील ४५ महसूली मंडळात सन २०१८-१९ या वर्षाकरिता दुष्काळी परिस्थिती जाहीर करुन उपरोक्त ४५ महसुली मंडळातील खातेदारांना टंचाई संदर्भात शासनाच्या प्रचलित धोरणानुसार संबंधित सर्व विभागांनी अनुज्ञेय सवलती देण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले आहे.

तालुका व दुष्काळ घोषित केलेले महसूली मंडळे पुढील प्रमाणे 

त्यानुसार लातूर- लातूर,बाभळगाव, हरंगुळ, मुरुड, गातेगाव,तांदूळजा, चिंचोली, औसा- औसा, लामजना, मातोळा, भादा, बेलकुंड, किन्नीथोट, किल्लारी, अहमदपूर-अहमदपूर, खंडाळी, आंधोरी, शिरुर ताजबंद, हाडोळती, निलंगा- पानचिंचोली,औराद, अंबुलगा, मदनसुरी, कासारशिरसी, उदगीर- उदगीर, नागलगाव, नळगीर, मोघा, हेर, देवर्जन चाकुर-चाकुर, नळेगांव, वडवळ, शळगाव, झरी.रेणापूर- पोहरेगाव, कारेपूर देवणी- देवणी, बोरोळ,वलांडी. जळकोट-जळकोट,घोणसी. शिरुर अनंतपाळ- शिरुर अनंतपाळ, साकोळ,हिसामाबाद.

- Advertisement -

निकषात शिथिलता

जमीन महसूलात सुट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन,शेतीची निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती. कृषि पंपाच्या चालू वीज विजबिलात ३३.५ टक्के सुट, शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परिक्षा शुल्कात माफी,रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता. आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर, टंचाई जाहिर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -